esakal | Hingoli : जिल्यात अतिवृष्टी; चोविस तासात ४०.७० मिमी. पावसाची नोंद
sakal

बोलून बातमी शोधा

heavy rain

Hingoli : जिल्यात अतिवृष्टी; चोविस तासात ४०.७० मिमी. पावसाची नोंद

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

हिंगोली : जिल्ह्यात मागच्या दोन दिवसापासून पाऊस सुरू आहे. रविवारी ता.पाच सकाळी आठ वाजेपर्यंत ४०.७० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. दहा मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे.आज मात्र सकाळी सुर्यदर्शन झाले.

जिल्ह्यात मागील चोवीस तासात आज सकाळी आठ वाजेपर्यंत ४०.७० मिलिमीटर पाऊस झाला. तालुका निहाय झालेला पाऊस पुढील प्रमाणे हिंगोली तालुका ५०.४० मिलिमीटर, कळमनुरी ३५.२० वसमत १८.२०, औंढा नागनाथ ६१.५०, सेनगाव ४७.५० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. आजपर्यंत जिल्ह्यात ९६.३२ टक्के पाऊस झाला आहे.

जिल्ह्यात मंडळनिहाय झालेला पाऊस पुढील प्रमाणे हिंगोली मंडळात ५९.३, नर्सी ५० ३, सिरसम ४७, बासंबा ५१.८, डिग्रस ५०.३, माळहिवरा ४६.८, खांबाळा ४७.३ तर एकुण ३५.२ मिलिमीटर पाऊस झाला. कळमनुरी मंडळात कळमनुरी४३.३, वाकोडी ६३.५, नांदापुर ५०.८, बाळापुर २४.३, डोंगरकडा २२.०, वारंगा ७.०, एकुण १८.२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

हेही वाचा: मंत्री डॉ. भागवत कराड सहकाऱ्यांसोबत रमले जुन्या आठवणीत

वसमत मंडळात ९.५, आंबा १८.०, हयातनगर १७.८, गिरगाव १५.८, हट्टा १६.०, टेंभुर्णी २८.३, कुरुंदा २२.३ एकुण १८.२ मिलिमीटर पाऊस झाला. औंढा मंडळात ६२.८, येहळेगाव ५० ८, साळणा ६२, जवळा बाजार ७०.३, एकुण ६१.५ मिलिमीटर पाऊस झाला. तर सेनगाव मंडळात ४९.९, गोरेगाव ४३ ३, आजेगाव ४८.३, साखरा ४८, पानकनेरगाव ४७.५, हत्ता ४०.३ एकुण ४० ७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. दहा मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात मागच्या काही दिवसापासून कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरु आहे. शुक्रवारी सकाळी सुर्यदर्शन झाले दिवसभर ऊन पडले होते. नंतर सायंकाळी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या शनिवारी दुपारी ढगाळ वातावरण निर्माण झाले त्यानंतर मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला तो रात्री उशिरापर्यंत सुरू होता. जिल्ह्यातील दहा मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. आज सकाळपासून दुपारपर्यंत ऊन सावलीचा खेळ सुरू होता. या पावसाने पिकांना दिलासा मिळाल्याने शेतकरी समाधानी झाले आहेत.

loading image
go to top