esakal | हिंगोली : कौटुंबिक वादातून वारंगा फाटा परिसरात पती- पत्नीची आत्महत्या
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

वारंगा फाटा येथे भवानी मंदिर परिसरराला लागून असलेल्या परिसरात पती-पत्नी दोघांनीही आत्महत्या केल्याची घटना घडली.

हिंगोली : कौटुंबिक वादातून वारंगा फाटा परिसरात पती- पत्नीची आत्महत्या

sakal_logo
By
मुजाहेद सिद्दीकी

वारंगा फाटा (जिल्हा नांदेड ) : कळमनुरी तालुक्यातील वारंगाफाटा येथील भवानी मंदिरालगत असलेल्या  कॅनलमध्ये महिलेचा तर राष्ट्रीय मार्गालगत एका पुरुषाचा मृतदेह म़ंगळवारी (ता.१७) आढळून आला. वारंगा फाटा येथे भवानी मंदिर परिसरराला लागून असलेल्या परिसरात पती- पत्नी दोघांनीही आत्महत्या केल्याची घटना घडली.

याबाबत सविस्तर वृत्त असे ही तरोडा तालुका हदगाव, जिल्हा नांदेड येथील सुभाष लक्ष्मण बोरकर व प्रमिला सुभाष बोरकर दोघांचा विवाह दहा ते बारा वर्षांपूर्वी झाला होता हे दोघेही कामा निमित्त औरंगाबाद येथे राहत होते. काही दिवसांपूर्वी आपल्या राहते गावी तरोडा, तालुका हदगाव  या गावी  मुलाबाळांसह परत आले. बुधवार (ता. ११)  नोव्हेंबर  काही कामानिमित्त दोघेही घराबाहेर पडले. मात्र ते दोघे घरी परतलेच  नाही. गुरुवारी (ता. १३) नोव्हेंबर रोजी सुभाष  बोरकर याचा मृतदेह राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या मोकळ्या जागेत झाडाखाली आढळून आला. त्यादिवशीपासून  प्रेमिला  सुभाष बोरकरचा शोध घरचे घेत होते तिचा पत्ता लागत नव्हता.  

हेही वाचा परभणी : घरगुती वादातून पत्नीने केला पतीचा दगडाने ठेचुन खून

मंगळवारी (ता. १७) नोव्हेंबर रोजी प्रेमिला हिचा मृतदेह भवानी माळालगत असलेल्या कॅनल मध्ये  झाडाला  लटकले असल्याची माहिती  मिळाली. मिळालेल्या माहितीवरून दोघात  कौटुंबिक वादातून  दोघांनीही आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे.

दोघांना दोन मुल आहेत. मुले सुजल (दहा वर्ष) व सत्यजित  (वय पाच वर्षे ) आहेत. सदर प्रकरणी  आखाडा बाळापूर पोलिस स्टेशन नोंद करण्यात आली असून  पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रवी हुंडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शेख बाबर हे करीत आहेत. 

संपादन - प्रल्हाद कांबळे