हिंगोली : ऑनलाइन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम 

विठ्ठल देशमुख
Monday, 28 December 2020

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारकडून शिक्षण ब्रेक लाऊन सर्व शाळा बंद करण्यात आल्या होत्या. कोरोनाच्या काळात विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहु नये म्हणून घरी बसल्या अँड्रॉइड मोबाईलद्वारे ऑनलाइन पध्दतीने शिकवणी सुरु आहे.

सेनगाव ( जिल्हा हिंगोली ) : सध्या सर्व शाळा बंद असल्यामुळे ऑनलाइन शिक्षण सुरु आहे. परंतु याकडे विद्यार्थ्यांचे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. त्यामुळे त्यामुळे त्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होत असून शासनाने ऑनलाइन शिक्षण बंद करून योग्य उपाययोजना करून शाळा सुरु करण्याची मागणी पालकांमधून होऊ लागली आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारकडून शिक्षण ब्रेक लाऊन सर्व शाळा बंद करण्यात आल्या होत्या. कोरोनाच्या काळात विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहु नये म्हणून घरी बसल्या अँड्रॉइड मोबाईलद्वारे ऑनलाइन पध्दतीने शिकवणी सुरु आहे. आता पर्यंत सर्वच शाळा बंद होत्या परंतु आता मात्र राज्य सरकारने ९ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शाळा उघडण्यास परवानगी दिली. त्यामुळे सेनगाव तालुक्यातील आठ शाळा सध्याच्या स्थितीत सुरु करण्यात आल्या आहेत. परंतु उर्वरित दोनशेच्या वर शाळा अजुनही बंद आहेत. त्यांचे ऑनलाइन शिक्षण जरी सुरु तरी याचा फायदा मात्र विद्यार्थी खुप प्रमाणात घेताना दिसून येत आहेत. त्यामुळे त्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होत असल्याचे पालकातुन बोलल्या जात आहे.

हेही वाचा हिंगोली : कुपटी येथील सीआरपीएफ जवानाचा ह्रदयविकाराने मृत्यू

गेल्या आठ ते नऊ महिन्यापासून शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचे ध्यान आता शिक्षणातुन कमी होत चालले आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे उज्वल भवितव्य धोक्यात येत आहे. तर अनेक कुटुंबांकडे अँड्रॉइड मोबाईल उपलब्ध नसल्यामुळे त्यांची मुले शिक्षणापासून वंचित राहु लागले आहेत. शिवाय या ऑनलाइन शिक्षणामुळे नवीन पीढीला मोबाईलचे व्यसन लागत असल्यामुळे शाळा सुरु झाल्यानंतर शाळेमध्ये मोबाईल घेऊन जाण्याची परवानगी मिळणार की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. मोबाईल हा लहान मुलांच्या आरोग्यास धोकादायक ठरु शकतो. अँड्रॉइड मोबाईल महाग असल्यामुळे अत्यंत गरीब कुटुंबीयांनी मुलांच्या शिक्षणासाठी मोबाईल आनायचा तरी कुठून असा प्रश्न सुध्दा उपस्थित होऊ लागला आहे. सेनगाव तालुक्यात १३३ गावे असून यामध्ये जवळपास २०० शाळा आहेत. त्यामुळे प्रशासनाने ऑनलाइन शिक्षणाला ब्रेक लाऊन योग्य उपाययोजना करून ह्या सर्व शिक्षकांना शाळा सुरु करण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी तालुक्यातील पालकांमधून जोर धरु लागली आहे.

शाळा सुरु करणे ही काळाची गरज आहे. ऑनलाइन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात येत आहे. यामुळे प्रशासनाने योग्य खबरदारी घेऊन लवकरात-लवकर तालुक्यातील सर्व शिक्षकांना शाळा सुरु करण्याची परवानगी द्यावी.

- भारत लोखंडे ,पालक, सेनगाव

 

संपादन- प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hingoli: Impact of online learning on students' quality hingoli news