इसापुर धरणातून जाणारे पाणी ३० डिसेंबरला रोखणार; सिंचन समितीचा निर्णय

पाणी रोखण्याचा निर्णय रविवारी ता. १२ शासकीय विश्रामगृहात झालेल्या सिंचन संघर्ष समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
सिंचन समिती
सिंचन समितीsakal

हिंगोली : जिल्ह्यातील सिंचनाच्या प्रश्नावर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ३० डिसेंबर रोजी ईसापुर धरणातून कालव्याद्वारे सोडण्यात येणारे पाणी रोखण्याचा निर्णय रविवारी ता. १२ शासकीय विश्रामगृहात झालेल्या सिंचन संघर्ष समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

कयाधू नदी वरील खरबी येथे बंधारा उभा करून त्याद्वारे नऊ किलोमीटरचा बोगदा व सात किलोमीटरच्या कॅनॉलद्वारे ईसापुर धरणामध्ये पाणी पोहोचविण्याचा घाट घालण्यात आला आहे. यासाठी साडे तीनशे कोटी रुपयांची तरतूद देखील करण्यात आली आहे असे या बैठकीत सांगण्यात आले. तसे झाल्यास कयाधू नदी कोरडी होऊन हिंगोली व कळमनुरी तालुक्याचा वाळवंट होणार आहे. त्यामुळे हा खरबी प्रकल्प रद्द करण्यात यावा त्याचबरोबर शासनाच्या लेखी असलेले सापळी धरण हे बांधणे शक्य होणार नसल्यामुळे शासनाने अधिकृतपणे सापळी धरण रद्द करावे.

सिंचन समिती
MHADA परीक्षेप्रकरणी तिघांना अटक; अमिताभ गुप्तांचा मोठा खुलासा

तसेच जिल्ह्यात मंजूर असलेले सिंचनाचे १४० प्रकल्प तात्काळ मार्गी लावावे,सिंचन विभागातील रिक्त पदे तात्काळ भरावीत इसापूर धरणाची उंची वाढविण्यात यावी, पैनगंगा नदी खालील गौळबाजार व इतर बॅरेजेस बांधण्यासाठी मंजुरी व निधी उपलब्ध करून द्यावा या व इतर मागण्या संदर्भात रविवारी सिंचन संघर्ष समितीची बैठक पार पडली.

या बैठकीला निमंत्रक माजी खासदार शिवाजी माने, खासदार हेमंत पाटील , आमदार तान्हाजी मुटकुळे , आमदार संतोष बांगर , जिल्हा परिषद अध्यक्ष गणाजी बेले , राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण , काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संतोष बोंढारे यांच्यासह जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य व जिल्ह्यातील सरपंच व जलतज्ञांची उपस्थिती होती.

बैठकीमध्ये मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले . यावेळी निमंत्रक शिवाजी माने यांनी इसापूर धरण दरवर्षी क्षमतेनुसार भरत असताना खरबी बंधाऱ्याचा घाट घालून धरणात पाणी वळविण्याची गरजच उरत नाही . त्यामुळे विशिष्ट लोकांच्या मर्जीसाठी हिंगोली जिल्ह्याचा वाळवंट कदापी होऊ देता येणार नाही याकरिता सर्वांनी एकत्र येण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. सिंचन विभागातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कारभारामुळे हिंगोली जिल्ह्याचे पाणी पळविले जात आहे. ज्याचा परिणाम भविष्यामध्ये हिंगोलीच्या सिंचनावर मोठ्या प्रमाणात होणार आहे. त्यामुळे काळाची गरज ओळखून याबाबतीत हिंगोलीकरांनी आवाज उठणे गरजेचे असल्याचे माने यांनी सांगितले.

सिंचन समिती
पुणे : विघ्नहरने FRP ची रक्कम न देऊन फसवणूक केली - शेतकरी नेते हांडे

या सर्व प्रश्नांबाबत बाबत सिंचन मंत्री जयंत पाटील यांच्याकडे पाठपुरावा करून तात्काळ बैठक घेण्याच्या बाबतीत निर्णय घेण्यात आला . यासंदर्भात दिलीप चव्हाण यांनी आपण जयंत पाटील यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सदरील प्रश्नावर बैठक आयोजित करण्याचे मागणी करणार असल्याचे जाहीर केले. तर शासनाचे लक्ष वेधण्यात करिता खासदार हेमंत पाटील व आमदार संतोष बांगर दोघांच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे शिष्टमंडळ घेऊन जाण्याचे ठरले . या प्रश्नांची तीव्रता लक्षात यावी याकरिता ईसापुर धरणातून सोडण्यात येणारे पाणी ३० डिसेंबर रोजी थांबविण्यासाठी जनआंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या आंदोलनात जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन देखील करण्यात आले.

बैठकीला मान्यवरांसह विठ्ठल चौथमल , राम रतन शिंदे , नंदकुमार खिल्लारी , भैया देशमुख , मधुकर मांजरमकर , जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष अनिल पतंगे , कानबाराव गरड , हमीद प्यारेवाले , युवा सेना जिल्हाप्रमुख राम कदम , सभापती अंकुश आहेर , अजय सावंत , बाबा नाईक , बाळासाहेब मगर , अँड. शिरसाट , बबलू मंगरूळकर आदीची उपस्थिती होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com