Hingoli News: म्हणे, ‘फाशी घ्या, पण पैसे भरा!’ ;आत्महत्येच्या धमकीनंतर बँक कर्मचाऱ्याचा व्यापाऱ्याला दम

Hingoli Loan Recovery Dispute: हिंगोली जिल्ह्यातील अकोली येथे थकीत व्यावसायिक कर्जाच्या हप्त्यावरून बँक कर्मचारी आणि कर्जदाराच्या पतीमध्ये वाद झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कर्जदाराच्या पतीने वसुलीसाठी दबाव आणल्याचा आरोप केला असून, बँक शाखाधिकाऱ्यांनी धमकी किंवा सक्ती केल्याचे नाकारले आहे.
A loan recovery dispute between a bank employee and a borrower’s husband has come to light in Hingoli.

A loan recovery dispute between a bank employee and a borrower’s husband has come to light in Hingoli.

esakal

Updated on: 

हिंगोली, : जिल्ह्यातील अकोली (ता. वसमत) येथे कर्जवसुलीच्या कथित जाचाचा प्रकार समोर आला. वसुलीसाठी आलेल्या बँक कर्मचाऱ्याला कर्जदार महिलेच्या पतीने आत्महत्येची धमकी दिली. त्यानंतर ‘फाशी घ्या, नाहीतर काहीही करा; पण पैसे द्या, ’ असे म्हणत बँक कर्मचारी दम देत असल्याचा व्हिडिओ मंगळवारी (ता. २७) व्हायरल झाला. अकोली येथील साधना उद्धव कदम यांनी जानेवारी २०२६ मध्ये एका बँकेच्या वसमत शाखेतून दोन लाख रुपयांचे व्यावसायिक कर्ज घेतले होते; मात्र त्यांचे हप्ते थकले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com