हिंगोली : श्रीलंकेत होणाऱ्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी गोरेगावच्या ममता महाजनची निवड

सीताराम देशमुख
Saturday, 26 December 2020

महाराष्ट्रातुन केवळ दोनच महिला खेळाडुंची निवड या स्पर्धेसाठी झाली आहे. यामध्ये चंद्रपूरची एक व हिंगोली जिल्ह्यातील गोरेगावची ममता महाजन हीची भारताच्या टिममध्ये निवड झाली आहे. श्रीलंकेत पुढील महिण्यात आंतरराष्ट्रीय इंडो श्रीलंका टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा होणार आहेत.

गोरेगाव (जिल्हा नांदेड) : सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथील व्यापारी विजय महाजन यांची मुलगी ममता महाजन हीची श्रीलंका येथे होणाऱ्या इंटरनॅशनल टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी भारताच्या टिममध्ये निवड झाली आहे. तीच्या यशाबद्दल तीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

महाराष्ट्रातुन केवळ दोनच महिला खेळाडुंची निवड या स्पर्धेसाठी झाली आहे. यामध्ये चंद्रपूरची एक व हिंगोली जिल्ह्यातील गोरेगावची ममता महाजन हीची भारताच्या टिममध्ये निवड झाली आहे. श्रीलंकेत पुढील महिण्यात आंतरराष्ट्रीय इंडो श्रीलंका टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा होणार आहेत.

ममता ही विदर्भ क्रिकेट असोसिएशनकडुन टेनिस बॉल क्रिकेट खेळत असते. नुकतीच विदर्भ टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनकडुन ममता ही उतराखंड हरिद्वार येथील स्पर्धेत खेळली आहे. ता. २३ ते २५ डिसेंबर दरम्यान या स्पर्धा पार पडल्या आहेत. स्पर्धेतील ममताचा खेळ पाहुनच तीची भारताच्या टिममध्ये निवड झाली आहे.

हेही वाचा - हिंगोली : सेनगाव तालुक्यात एका गोठ्याला आग लागून दोन लाखांचे नुकसान

ममताने या पुर्वी अनेक स्पर्धेत भाग घेवुन आपल्या ऊत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केलेले आहे. दिल्ली, तामिळनाडू येथील स्पर्धेतही ममताने व्हिसिएकडुन चांगल्या खेळाचे प्रदर्शन केले होते. ममता फलदांजी, गोलदांजी व क्षेत्ररक्षणमध्ये तरबेज असल्याने ऑलराउंडर म्हणुन भारतीय टिममध्ये तीची निवड झाली आहे.

रिसोड जि. वाशिम येथुन जिल्हा स्तरावर चांगल्या खेळामुळे तीची विदर्भ असोसिएशनमध्ये निवड झाली होती. शुक्रवारी (ता. २५) डिसेंबर रोजी ममताची निवड भारताच्या ईंटरनशनल टिममध्ये झाल्याचे पत्र तिला प्राप्त झाले आहे. ममताचे वडील विजय महाजन व आई वंदना महाजन यांचा गोरेगाव येथे कापड व स्टेशनरीचा व्यवसाय असून पहिल्यापासुनच त्यांनी ममतातील खेळाडु वृत्तीस प्रोत्साहन दिले आहे. खेळाबरोबरच ममता ही वाणिज्य शाखेतुन पदवीचे शिक्षणही घेत आहे.

संपादन - प्रल्हाद कांबळे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hingoli: Mamata Mahajan of Goregaon has been selected for the tennis ball cricket tournament to be held in Sri Lanka hingoli news