हिंगोली जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 जुलै 2017

गिरगाव - गिरगाव (ता. वसमत. जि. हिंगोली) येथील रामचंद्र गणपतराव नादरे (वय 48) या कर्जबाजारी शेतकऱ्याने शनिवारी (ता. 8) रात्री राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

गिरगाव - गिरगाव (ता. वसमत. जि. हिंगोली) येथील रामचंद्र गणपतराव नादरे (वय 48) या कर्जबाजारी शेतकऱ्याने शनिवारी (ता. 8) रात्री राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

नादरे यांच्या नावावर दोन एकर शेती होती. त्यांच्यावर येथील महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेचे 1 लाख 10 हजार रुपयांचे कर्ज होते. सततची नापिकी व यंदा पावसाने फिरवलेली पाठ यामुळे नैराश्‍य आल्याने त्यांनी गळफास घेतला. त्यांच्या पश्‍चात आई, पत्नी, दोन मुलगे व दोन विवाहित मुली असा परिवार आहे.

Web Title: hingoli marathwada news farmer suicide