Hingoli : पेरू लागवडीतून लाखोंचे उत्पादन; युवा शेतकऱ्याचा प्रयोग

शेतीबरोबर आधुनिक शेती करण्याचा निर्णय मध्यंतरी घेतलेला असून
farmer
farmer sakal

हिंगोली : मेहनत केल्यास खडकाळ जमिनीमध्येही अत्यंत कमी पाण्यावर पेरू फळबाग यशस्वी होते, लाखो रुपयांचे उत्पन्नही मिळते, हे युवा शेतकऱ्याने दाखवून दिले आहे. सोपान शिंदे असे या शेतकऱ्याचे नाव असून, त्यांना कृषी विद्यापीठाने अनेक पुरस्कार देऊन गौरविले आहे.

पांगरा शिंदे येथील शेतकरी सोपान शिंदे यांना सात एकर शेती आहे. त्यांनी पारंपरिक शेतीबरोबर आधुनिक शेती करण्याचा निर्णय मध्यंतरी घेतलेला असून, त्यांनी शेतात परसबाग केली आहे. यात ५० प्रकारची झाडे आहेत. यामध्ये आंबा, नारळ, ॲपल, फणस आदी झाडांचा समावेश आहे. तसेच त्यांनी रेशीम शेती देखील करून यात चांगले उत्पन्न मिळविले आहे. अनेक शेतकऱ्यांना त्यांनी या संदर्भात मार्गदर्शन करुन गावात पन्नास ते साठ शेतकरी तयार केले आहेत.

गत तीन वर्षांपूर्वी त्यांनी खडकाळ जमिनीमध्ये अत्यंत कमी पाण्यावर एका एकरात पेरूची लागवड केली होती. या बागेत अनुक्रमे पहिल्या वर्षी हळद, दुसऱ्या वर्षी सोयाबीन आणि कांदा बिजोउत्पादनाचा प्रयोग करून पाहिला. यात आंतरपीक पद्धतीने लागवड खर्च आणि नफ्याचा मेळ घालून अधिकचे उत्पन्न पेरू बागेतून घेतले. यावर्षी एक नवीन पीक आपल्या भागात रुजू पाहत आहेत, त्या राजमा पिकाची टोकण पद्धतीने पेरू बागेत त्यांनी आंतरपीक म्हणून लागवड केली आहे.

पहिल्या वर्षीच सोपान शिंदे यांना पेरू बागेतून उत्पन्न मिळण्यास सुरवात झाली. पहिल्या वर्षी तीन क्विंटल पेरू निघाले, यामध्ये त्यांना खर्च जाता १५ ते २० हजार रुपये उत्पन्न मिळाले. दुसऱ्या वर्षी ९० हजार ते एक लाख तर यंदा आठ क्विंटल पेरूची जागेवरून विक्री करत त्यांना सव्वालाख रुपये मिळाले आहेत. शिवाय पेरूला आंध्र प्रदेश राज्यातून मोठ्या प्रमाणात मागणी असून, चांगला भाव मिळाला आहे.

सोपान शिंदे यांचा उपक्रम पाहून परिसरातील अनेक शेतकरी प्रभावित झाले आहेत. आता पांगरा शिंदे भागातील इतर शेतकरी देखील ‘विकेल ते पिकेल’ हे धोरण अंगीकारण्याचा प्रयत्न करून पेरू, सीताफळ फळबाग लागवडीकडे वळले आहेत.

शेतीमध्ये वेगळा प्रयोग करण्याची जिद्द मनी बाळगत खडकाळ जमिनीत पेरूची बाग घेतली. यासाठी योग्य नियोजन व कृषी विभागाचे मार्गदर्शन मिळाल्याने प्रयोग यशस्वी झाला आहे. शेतीमध्ये मेहनतीला फळ नक्कीच मिळते.

— सोपान शिंदे, शेतकरी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com