esakal | हिंगोली : किन्होळा येथे चोरून वीज वापरण्यास मज्जाव केल्यामुळे महावितरणच्या तंत्रज्ञास मारहाण
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

. यावेळी टाकलेला आकडा काढुन कारवाई करत असताना, आमचा आकडा का काढलास तो परत लावून दे असे म्हणत मेनाजी कानोरे व त्याचा मुलगा अमित मेनाजी कानोरे यांनी वरीष्ठ तंत्रज्ञ राजू आवटे यांना शिवीगाळ करत मारहाण केली व हातपाय तोडण्याची धमकी दिली. याप्रकरणी वसमत ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हिंगोली : किन्होळा येथे चोरून वीज वापरण्यास मज्जाव केल्यामुळे महावितरणच्या तंत्रज्ञास मारहाण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वसमत (जिल्हा हिंगोली) : वसमत तालूक्यातील मौजे किन्होळा येथे आकोडा टाकून होणाऱ्या वीजचोरीस आळा घालण्याच्या दृष्टीने राबविलेल्या मोहीमेत आपल्या सहकांऱ्यासह वरीष्ठ तंत्रज्ञ राजू आवटे गेले असताना मेनाजी कानोरे हे आकडा टाकून वीजचोरी करत असल्याचे दिसून आले. यावेळी टाकलेला आकडा काढुन कारवाई करत असताना, आमचा आकडा का काढलास तो परत लावून दे असे म्हणत मेनाजी कानोरे व त्याचा मुलगा अमित मेनाजी कानोरे यांनी वरीष्ठ तंत्रज्ञ राजू आवटे यांना शिवीगाळ करत मारहाण केली व हातपाय तोडण्याची धमकी दिली. याप्रकरणी वसमत ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गेल्या सात दिवसापासून वीज गळतीस आळा घालण्याच्या हेतूने हिंगोली मंडळांतर्गत सर्वत्र आकोडे टाकून वीजचोरी करणाऱ्यावर कारवाई करत आकडे काढून टाकण्याची मोहीम मोठयाप्रमाणावर राबवली जात आहे. गिरगाव शाखा कार्यालयाचे वरिष्ठ तंत्रज्ञ राजू आवटे हे कनिष्ठ अभियंता जीवन राठोड आणि कर्मचारी विशाल पांडुरंग खंदारे, योगेश गंगाधर आवटे, हनुमंत संगेपाड, संदीप मधुकरराव इंगोले, प्रवीणकुमार उत्तम चव्हाण, श्रीराम महाजन येरवाड, अनिल सुभाषराव अवकळे, विनोद चंदर वाघमारे यांचे पथक विज चोरी करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी किन्होळा येथे बुधवारी (दि.२८) गेले होते.

हेही वाचा नांदेड जिल्ह्यात फक्त चार टक्केच पॉझिटिव्ह रुग्ण

वसमत ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा

विज चोरीचे अकोडे काढत असताना गावातील मेनाजी कानोरे याने राजू आवटे यांना मज्जाव करत म्हणाला की माझा काढलेला आकोडा जशास तसा पुन्हा टाकून दे, नाहीतर हातपायतोडून गावातून काढून देईन. त्यानंतर त्याचा मुलगा अमित मेनाजी कानोरे यानेही शिवीगाळ करून मारहाण केली. याबाबत शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याबद्दल वसमत ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ३५३, २८४, ३२३, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

loading image
go to top