हिंगोली पालिकेचा सीटीझन फिडबँकमध्ये देशात पहिला क्रमांक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

hingoli

हिंगोली पालिकेचा सीटीझन फिडबँकमध्ये देशात पहिला क्रमांक

हिंगोली : हिंगोली पालिकेने स्वच्छ सर्वेक्षण अभियानात सीटिझन फिडबॅकमध्ये देशात पहिला तर कचरा मुक्त शहरामध्ये पश्चिम विभागात तिसरा क्रमांक पटकविला आहे शनिवारी ता.२० दिल्ली येथील विज्ञान भवनात मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण झाले.

केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियान २०२१ चा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला होता. यामध्ये हिंगोली पालिकेने यश मिळविले आहे. शनिवारी दिल्ली येथील विज्ञान भवनात छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल , मिझोरमचे मुख्यमंत्री झोराम थांगा , केंद्राच्या गृहनिर्माण आणि शहरी विकास विभागाचे प्रधान सचिव दुर्गाशंकर मिश्रा, उपसचिव रुपा मिश्रा यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले.

marathwada

marathwada

हेही वाचा: नागपूर : उद्योग आले पूर्वपदावर : ९० टक्के लसीकरण पूर्ण

यावेळी पालिकेचे मुख्याधिकारी डॉ . अजय कुरवाडे, उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण , पालिकेच्या स्वच्छता विभागाच्या अभियंता सनोबर तसनीम , कर्मचारी बाळू बांगर यांनी हा पुरस्कार स्विकारला आहे. हिंगोली पालिकेला ५० हजार ते एख लाख लोकसंख्येच्या शहरातील सिटीझन फिडबॅक मध्ये देशात पाहिला क्रमांक , कचरामुक्त शहरामध्ये तीसरे मानांकन तर पश्चिम विभागातील सात राज्यातून घेण्यात आलेल्या फिडबॅकमध्ये तिसरा क्रमांक तसेच कचरामुक्त शहर व सिटीझन फिडबॅकमध्ये हिंगोली पालिकेने यश मिळविले आहे.

loading image
go to top