हिंगोली : राष्ट्रीय महामार्ग रस्त्यावरील नाम फलकांनी घेतला मोकळा श्वास, रस्त्यांची पोलिसांकडून साफसफाई

मुजाहेद सिद्दीकी
Monday, 7 December 2020

अकोला नांदेड राष्ट्रीय महामार्ग  लगत वाढलेल्या झाडाझुडपांनी रस्ता,वळण व नामफलक पूर्णतः वेढून घेतले होते त्यामुळे अपघात घडत होते व नाम फलक दिसत असल्यामुळे वाहन चालकांची तारांबळ उडत होती .

वारंगा फाटा (जिल्हा हिंगोली) :  राष्ट्रीय महामार्गा वर असलेल्या नाम फलकांना झाडाझुडपांनी  वेडुन घेतले होते त्याची पोलिसांनी साफसफाई  केल्याने नाम फलकांनी मोकळा श्वास घेतला.

अकोला नांदेड राष्ट्रीय महामार्ग  लगत वाढलेल्या झाडाझुडपांनी रस्ता,वळण व नामफलक पूर्णतः वेढून घेतले होते त्यामुळे अपघात घडत होते व नाम फलक दिसत असल्यामुळे वाहन चालकांची तारांबळ उडत होती . यावर उपाय म्हणून आखाडा बाळापूर पोलीस स्टेशन सहाय्यक पोलीस निरीक्षक रवी हुंडेकर, वारंगा फाटा बीट जमादार शेख बाबर यांनी पुढाकार घेऊन स्वखर्चातून रस्त्यालगत असलेल्या झाडाझुडपाची साफसफाई जेसीबी मशीनद्वारे केली पोलिसांनी केलेल्या या सामाजिक उपक्रमाबद्दल सर्वसामान्यांतून त्यांचे कौतुक होत आहे.

हेही वाचा - ६० वर्षीय शेतकऱ्याच्या डोक्यात वार करून खून, कळमनुरी तालुक्यातील झरा येथील घटना

यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक रवी हुंडेकर, शेख बाबर, भगवान वडकिल्ले ,नागोराव बाबळे ,सय्यद शाहिद आधी पोलीस कर्मचारी हजर होते. 
अशी झाडेझुडपे राष्ट्रीय रस्त्यावर बऱ्याच ठिकाणी वाढले असून याठिकाणी संबंधित विभाग लक्ष देत नसल्यामुळे पोलिसांना हे कार्य करावे लागले आता तरी संबंधित विभागाने गांभीर्याने घेऊन रस्त्यालगतची झाडेझुडपे साफ करून घेण्याची मागणी जाणकार नागरिकांतून होत आहे.

 

संपादन-  प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hingoli: Name boards on National Highways take a deep breath, roads cleaned by police hingoli news