औंढा नागनाथाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 ऑगस्ट 2017

आज तिसऱ्या श्रावण सोमवारी 90 हजार भाविकांनी शांततेत नागनाथाचे दर्शन घेतले. तसेच देवस्थानच्या वतीने भाविक भक्तांना फराळाची व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली. या वेळी दिवसभर मंदीरामध्ये दिंडयासह भाविक भक्त मोठया उत्साहाने दाखल झाले होते.

औंढा नागनाथ : श्रावण महिन्यानिमित्त देशातील 12 ज्योतीर्लींगापैकी एक असलेलया श्री नागेश्वर आठवे ज्योतीर्लींग नगरीत तिसरा श्रावण सोमवारी 90 हजार भाविकांनी श्री नागेश्वर भगवानचे दर्शन घेतले.

देवस्थानचे सल्लागार शिवाजीराजे देशपांडे  सपत्नीक, विश्वस्त महेश बियाणी तसेच विश्वस्त रमेशचद्र बगडिया यांनी श्रीची महापुजा व दुग्ध अभिषेक केला. भाविकांच्या दर्शनासाठी मंदीर खुले करण्यात आले. तसेच श्रीच्या दुग्धाभीषेकाचे आवर्तने श्रीपाद दिक्षित.कृष्णा रुषी. तुळजादास भोपी, श्रीपाद भोपी, पदमाक्ष पाठक, आबागुरु बल्लाळ, बंडु पंडीत, निळकंठ देव, ब्राम्हणांनी म्हणाले. श्री च्या दर्शनासाठी देशातील व पंचकोषीतील भाविक भक्त औंढा नगरीत हरहर महादेव, बम बम भोले, नागनाथ महाराज की जय, आदी घोषवाक्यांनी मंदीर परीसर दुमदुमला.

आज तिसऱ्या श्रावण सोमवारी 90 हजार भाविकांनी शांततेत नागनाथाचे दर्शन घेतले. तसेच देवस्थानच्या वतीने भाविक भक्तांना फराळाची व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली. या वेळी दिवसभर मंदीरामध्ये दिंडयासह भाविक भक्त मोठया उत्साहाने दाखल झाले होते. श्रावण सोमवार निम्मीत्त देवस्थानचे अध्यक्ष तथा तहसिलदार पाडुरंग माचेवाड, विश्वस्त गणेश देशमुख, विद्याताई पवार, विलास खरात, मुंजाभाउ मगर, गजानन वाखरकर, प्रा. देविदास कदम, आनंद निलावार, पंजाब गव्हणकर, डाँ. किसन लखमावार हे विश्वस्त दिवसभर मंदिरात बसले होते. तसेच पोलिस अधीक्षक आरविद चावरिया, उपपोलिस अधीक्षक सचिन गुंजाळ यांनीही मंदीर परीसराचा कडक पोलीस बंदोबस्ताकडे लक्ष देवुन बंदोबस्ता बाबत पोलीस कर्मचारी यांना सुचना दिल्या. यावेळी निळकंठ देव, वैजनाथ पवार, शंकर काळे, बापुराव देशमुख, सुरक्षा गार्ड बबन सोनुने, यांनाही खुप परीश्रम घेतले. पोलिस अधीक्षक चावरीया यांच्या मार्गदर्शनाखाली उपपोलिस अधीक्षक सचीन गुंजाळ, सिध्दनाथ भोरे पोलिस निरीक्षक गणपत दराडे, पोलिस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे, उपपोलिस निरीक्षक मोहन ढेरे, उपपोलिस निरीक्षक साईनाथ अनमोड, पोलिस निरीक्षक बालाजी येवते तसेच बॉम्ब शोधक व नाशक यांनी मंदीर परीसराची कडक पाहणी केली .यावेळी स्वान राजा बिडिडीएस पथक होते आदी प्रकारे पोलीस प्रशासनाच्या वतीने कडक बंदोबस्त श्री नागनाथ मंदीरात केला.

Web Title: Hingoli news Aundha Nagnath temple