हिंगोली: तब्बल २९६ गावांत एक गाव एक गणपती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हिंगोली: तब्बल २९६ गावांत एक गाव एक गणपती

हिंगोली: तब्बल २९६ गावांत एक गाव एक गणपती

हिंगोली : कोरोनाकाळात एक गाव एक गणपती उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. जिल्ह्यांमध्ये २९६ ठिकाणी एक गाव एक गणपतीची स्थापना करण्यात आली आहे. जिल्ह्यात ९८० ठिकाणी गणेशमूर्तीची स्थापना झाली आहे. हिंगोली जिल्ह्यांमध्ये शुक्रवारी ता.दहा गणेश मुर्तीची शांततेत स्थापना करण्यात आली आहे.

हेही वाचा: उस्मानाबाद जिल्ह्याची औषधविक्री व्यवस्था रामभरोसे?

मागच्या काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, यांच्यासह पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, सहायक पोलिस अधीक्षक यतिश देशमुख यांनी गणेश मंडळांच्या व शांतता समितीच्या बैठका घेऊन कोविडच्या नियमांचे पालन करुन गणेश मंडळांनी एक गाव एक गणपती राबविण्याचे आवाहन केले होते. प्रशासनाच्या या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळाला असून २९६ गावात एक गाव एक गणपती ही संकल्पना राबविण्यात आली आहे. त्यामुळे या गावात गणेशमुर्ती पाहण्यासाठी होणारी गर्दीवर नियंत्रण मिळणार आहे.

जिल्ह्यामध्ये एकूण ९८० ठिकाणी गणेशमूर्तीची स्थापना झाली आहे. यामध्ये शहरी भागात २४९ ठिकाणी ग्रामीण भागामध्ये ७३१ ठिकाणी गणेशमूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. पोलीस प्रशासनाने गणेशमूर्ती स्थापना मिरवणुकीला परवानगी नाकारली. ना ढोल ना ताशा, ना गुलालाची उधळण, व जय घोषाच्या गजरा विना गणेश मंडळांनी साध्या पद्धतीने गणेशमुर्तीची स्थापना केली आहे.

जिल्ह्यात गणेश मंडळांच्या ठिकाणी तसेच संवेदनशील भागात पोलिसांची गस्त सुरू करण्यात आली आहे. बंदोबस्तासाठी पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांसह राज्य राखीव दलाचे जवान तसेच गृहरक्षक दलाचे जवान तैनात करण्यात आले असल्याचे पोलिस प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे.

दरम्यान हिंगोली शहरात ७१ गणेश मंडळाची स्थापना झाली आहे. यात अकरा परवाना धारक तर ७१ विनापरवाना असलेल्या गणेश मंडळाचा सहभाग आहे. औंढा शहरात १६, कळमनुरी २३, वसमत शहर ८८ यात ७७ परवाना तर ११ विनापरवाना आहेत. सेनगाव आठ यात पाच परवाना तर तीन विनापरवाना असलेल्या गणेश मंडळाचा समावेश आहे.

यासह बाळापुर व हट्टा येथे एकूण नऊ परवाना, पाच विनापरवाना, कुरुंदा एकूण सात परवाना तीन, विनापरवाना चार, गोरेगाव एकूण ११ परवाना सहा, विनापरवाना पाच, नर्सी एकूण चार, बासंबा एकूण तीन परवाना एक, विनापरवाना दोन गणेश मंडळाचा समावेश आहे.

Web Title: Hingoli One Ganpati In 296 Villages

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Hingoli