Hingoli Bank Account Scam: दहा हजारांसाठी बॅंक खाते भाडेतत्त्वावर ऑनलाइन बेटिंगसाठी वापर, हिंगोलीत सहा महिन्यांपासून गोरखधंदा
Hingoli Online Betting Scam Exposed: अवैध ऑनलाइन बेटिंग आणि लाखो रुपयांच्या व्यवहारांसाठी अनेक बँक खातेधारकांना १० हजारांचे आमिष दाखवून त्यांचे खाते भाडेतत्त्वावर घेण्यात आले.
हिंगोली : अवैध ऑनलाइन बेटिंग आणि लाखो रुपयांच्या व्यवहारांसाठी अनेक बँक खातेधारकांना १० हजारांचे आमिष दाखवून त्यांचे खाते भाडेतत्त्वावर घेण्यात आले. राजस्थानातील दोघे हिंगोलीत ६ महिन्यांपासून हा गोरखधंदा चालवत होते.