esakal | हिंगोली: वैद्यकीय कारणासाठी तरी पैसे द्या; रुग्णांच्या नातेवाईकांना बँका धरत आहेत वेठीस

बोलून बातमी शोधा

वैद्यकीय उपचार
हिंगोली: वैद्यकीय कारणासाठी तरी पैसे द्या; रुग्णांच्या नातेवाईकांना बँकाकडून नकार
sakal_logo
By
संजय बर्दापूरे

वसमत ( जिल्हा हिंगोली ) : एक मेपासून जिल्हा प्रशासनाने बँकेतून रोकड व्यवहार करण्यास मनाई केल्याने एटीएम कार्ड नसलेल्या व ई- बँकींग सुविधा ( Bank on line service ) वापरत नसलेल्या ग्रामीण भागातील असंख्य रुग्णांच्या नातेवाईकांसमोर उपचारासाठी अनंत अडचणी समोर उभारल्या आहेत. किमान वैद्यकीय कारणासाठी ( Medical reason ) तरी बँकेतून रक्कम मिळावी अशी मागणी केली जात आहे. (Pay for medical reasons; The relatives of the patients are being held hostage by the banks)

याबाबत माहिती अशी की, सद्यस्थितीत कोरोना संसर्गाने सर्वत्र थैमान घातले आहे. हातचे काम बंद आणि खर्च वाढला असल्याने बहुतांशी कुटूंब आर्थिक विवंचनेत सापडले आहे. खबरदारी व कोरोना चेन तुटावी यासाठी हिंगोली जिल्हा प्रशासनाने जिल्हाभरात कडक लाँकडाऊन सुरु केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून बँकेतून रोख रक्कमेचा व्यवहारास मनाई केली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत शहरांपेक्षा ग्रामीण भाग जास्त ढवळून निघाला असून कोरोना संसर्ग रुग्णांचे प्रमाणही अधिक आहे. काम बंद आणि खर्च वाढल्याने रुग्णांच्या नातेवाइकांवर अधिकचा आर्थिक ताण वाढला आहे.

हेही वाचा - शस्त्र आपल्या शरीराचे संरक्षण करु शकतील पण मनाचं संरक्षण करु शकत नाहीत. शस्त्राने आत्मबल देतील असे सांगता येत नाही. सकारात्मक विचार, संयम, सहनशीलता, सकारात्मक भावनाच मनाला उभारी आणि आत्मबळ देतात.

ग्रामीण भागात अनेकजण बँकेची ई- सुविधा किंवा एटीएम कार्ड वापरत नाहीत. त्यामुळे त्यांना बँकेतून पैसे घेतल्याशिवाय पर्याय नाही. त्यातच शासकीय कोविड हाँस्पिटलमध्ये जरी रुग्ण दाखल असला तरी रुग्ण ठिक होईपर्यंत पंधरा ते वीस हजार रुपये खर्च येत आहे. तर खासगी कोविड हाँस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णाविषयी तर न बोललेलेच बरे अशी परिस्थिती आहे. अक्षरशः पैशाची लाखाळीच डॉक्टरांना वाहावी लागत आहे. त्यामुळे पैशाची तजवीज करण्यासाठी अनेक रुग्णांचे नातेवाईक बँकेत खेटे मारत आहेत. परंतू बँक अधिकारी जिल्हा प्रशासनचे आदेश सांगून पैसे देण्यास मनाई करत आहेत. परिणामी पैसे असूनही रुग्णांच्या नातेवाइकांना उपचाराचे आर्थिक गणित जुळविण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. जीवन- मरणाच्या या काळात किमान वैद्यकीय कारणासाठी तरी बँकेतून पैसे देण्यात यावे अशी मागणी रुग्णांच्या नातेवाईकांमधून केली जात आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

https://www.youtube.com/watch?v=eTfPn1xHlkI