हिंगोली : पोस्ट ऑफिसचे कर्मचारी लाक्षणिक संपावर ; कार्यालयात शुकशुकाट 

राजेश दारव्हेकर
Thursday, 26 November 2020

डाकसेवक संघटनेने विविध प्रलंबित मागण्यासाठी देशव्यापी संप पुकारला आहे.यापूर्वी देखील संघटनेने ता.२० आँक्टोबरला बोनस मिळावा यासाठी मुख्यालयी धरणे आंदोलन केले होते. त्यानंतर (ता.६)नोव्हेंबर रोजी विभागीय स्तरावर धरणे आंदोलन तर (ता.१९) नोव्हेंबर रोजी रिजनल स्तरावर आंदोलन केले होते. तरी देखील अद्यापही मागण्या मान्य झाल्याने पुन्हा गुरुवारी डाकसेवक कर्मचारी संघटनेने देशव्यापी लाक्षणिक संप पुकारल्याने कार्यालयीन कामकाज ठप्प पडले आहे.

हिंगोली :  जीडीएस कर्मचाऱ्यांना आरोग्य सुविधांचा लाभ दयावा, कर्मचाऱ्यांना सरकारी दर्जा द्यावा अशा विविध मागण्यासाठी अखिल भारतीय ग्रामीण डाकसेवक कर्मचारी गुरुवारी (ता.२६ )एक दिवसाच्या लाक्षणिक संपावर गेल्याने कार्यालयात शुकशुकाट जाणवत असल्याचे चित्र पाहवयास मिळत होते.

डाकसेवक संघटनेने विविध प्रलंबित मागण्यासाठी देशव्यापी संप पुकारला आहे.यापूर्वी देखील संघटनेने ता. २० आँक्टोबरला बोनस मिळावा यासाठी मुख्यालयी धरणे आंदोलन केले होते. त्यानंतर (ता. ६) नोव्हेंबर रोजी विभागीय स्तरावर धरणे आंदोलन तर (ता. १९) नोव्हेंबर रोजी रिजनल स्तरावर आंदोलन केले होते. तरी देखील अद्यापही मागण्या मान्य झाल्याने पुन्हा गुरुवारी डाकसेवक कर्मचारी संघटनेने देशव्यापी लाक्षणिक संप पुकारल्याने कार्यालयीन कामकाज ठप्प पडले आहे.

हेही वाचा कुष्ठरोग व क्षयरोग रुग्णांनी स्वत:हून उपचारासाठी पुढे यावे- जिल्हाधिकारी डॉ. विपीन -

पोस्ट ऑफिस कार्यालयातील कर्मचाऱ्यांना गोठलेला महागाई भत्ता तातडीने सुरु करावा, गट विमा राशी पाच लाख करावी, मानधन किंवा प्रोत्साहन भत्यावर केल्या जाणाऱ्या कामासाठी टाईम फ्याक्टर व अवास्ताविक लक्ष निम्यावर आणणे,डाक सहायकाच्या रिक्त पदावर विस टक्के आरक्षण व वयाची मर्यादा ३५ ऐवजी ४०करावी अशा विविध प्रलंबित मागण्या अद्याप सुटल्या नसल्याने गुरुवारी डाकसेवक संघटनेने देशव्यापी एक दिवसीय लाक्षणिक संपाचे हत्यार उपसले असल्याने संपूर्ण देशभरात कार्यालयीन कामकाज ठप्प पडले असून ग्राहकांची मात्र या संपामुळे कोंडी झाली असून, कार्यालयात शुकशुकाट जाणवत होता. काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी केवळ होमगार्ड यांना बंदोबस्त करण्यासाठी तैनात केले होते.

 

 संपादन-  प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hingoli: Post office workers on symbolic strike hingoli news