हिंगोली : खाजगी प्रवासी बसधारकाने सुधारीत मानक कार्यपध्दतीचे पालन करावे

राजेश दारव्हेकर
Friday, 13 November 2020

यामध्ये खाजगी प्रवासी बस ऑपरेटर यांनी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य शासनाने तसेच परिवहन विभागाने निर्गमित केलेल्या निर्देशांचे तंतोतंत पालन करावे. महाराष्ट्र मोटार वाहन नियमच्या  तरतुदीनुसार लोकसेवा वाहनाच्या प्रत्येक चालकाने आपले वाहन स्वच्छ व निर्जंतुकीकरण केलेल्या स्थितीत ठेवणे आवश्यक आहे.

हिंगोली : परिवहन आयुक्त यांच्या मार्फत खाजगी प्रवासी बसेस यांनी वाहतूक करतांना अंमलात आणावयाची सुधारीत मानक कार्यपध्दतीचे निर्देश प्राप्त झाले आहेत. त्यानुसार पर्यटक, प्रवासी वाहतूक करताना खाजगी प्रवासी बसेसकरिता खालीलप्रमाणे सुधारीत मानक कार्यपध्दतीचे तंतोतंत पालन करावे आणि खाजगी प्रवासी बसधारकाने अटीचे पालन होईल याची खबरदारी घ्यावी.

यामध्ये खाजगी प्रवासी बस ऑपरेटर यांनी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य शासनाने तसेच परिवहन विभागाने निर्गमित केलेल्या निर्देशांचे तंतोतंत पालन करावे. महाराष्ट्र मोटार वाहन नियमच्या  तरतुदीनुसार लोकसेवा वाहनाच्या प्रत्येक चालकाने आपले वाहन स्वच्छ व निर्जंतुकीकरण केलेल्या स्थितीत ठेवणे आवश्यक आहे. त्यानुसार कंत्राटी बसच्या चालकाने त्यातून प्रवास करणारा पर्यटक गट बदलतांना तसेच प्रवासाच्या प्रत्येक दिवशी, प्रत्येक फेरीअंती प्रवासी बसचे निर्जंतुकीकरण करावे. बसचे आरक्षण कक्ष, कार्यालय, चौकशी कक्ष स्वच्छ ठेवावे व उपस्थित कर्मचाऱ्यांनी मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा. बसेस जिथे उभ्या आहेत त्या ठिकाणी गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. 

हेही वाचा नांदेड- ​बायपास सर्जरी विभाग सुरु करण्यासाठी अधिष्ठाता प्रयत्नशील, मोडुलर प्लॉन लवकरच प्रत्यक्षात येण्याची शक्यता

मास्क परिधान न केलेल्या प्रवाशांना बसमध्ये प्रवेश देऊ नये. बसच्या प्रवेशद्वाराजवळ सॅनिटायझर ठेवण्यात यावे. बसमध्ये काही अतिरिक्त मास्क ठेवण्यात यावेत. बसमध्ये प्रवेश करणाऱ्या प्रवाशांची थर्मल गनद्वारे तपासणी करण्यात यावी. कोरोना आजाराची प्राथमिक लक्षणे दिसत असल्यास त्यास प्रवासास प्रतिबंध करण्यात यावा. सर्व प्रकारच्या खाजगी कंत्राटी बस वाहनांमधून शंभर टक्के क्षमतेने पर्यटक, प्रवासी वाहतुकीस परवानगी देण्यात यावी. 

चालकाने प्रवासा दरम्यान जेवण, अल्पोपहार, प्रसाधनग्रहाचा वापर करण्याकरिता बस थांबविताना ही ठिकाणे स्वच्छ आहेत याची खात्री करावी. तसेच बसमध्ये चढतांना, उतरतांना व खानापानाकरीता व प्रसाधनग्रहाच्या वापराकरीता प्रवासादरम्यान शारिरीक अंतर ठेवण्याची दक्षता घेण्याबाबत प्रवाशांना सूचना देण्यात याव्यात. प्रवाशांना बसमध्ये कचरा फेकू देवू नये व कचराकुंडीचा वापर करावा. प्रवासी बसचे निर्जंतुकीकरण करणे तसेच त्याचे अभिलेख ठेवणे याची जबाबदारी परवानाधारकांची असेल.  या सूचनांचे पालन न केल्यास परनावाधारकां विरुध्द मोटार वाहन अधिनियम  केंद्रीय मोटार वाहन नियम आपत्ती व्यवस्थापन  तरतुदीनुसार  कायदेशीर कारवाई करण्यात येईल केंद्र व राज्य शासनाकडून वेळोवेळी प्राप्त होणाऱ्या निर्देशानुसार तसेच प्रशासकीय दृष्टीकोनातून कार्यपध्दतीची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्यात यावी, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी  कळविले आहे.

संपादन - प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hingoli: Private passenger bus owners should follow the revised standard procedure hingoli news