esakal | हिंगोली : सेनगाव तालुक्यातील विजेचा प्रश्न कायम
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

गेला महीना भरापासून तालुक्यातील ब्रम्हवाडी गावातील विज पुरवठा खंडित केला जात आहे. सकाळी पाच ते ११ वाजतापर्यंत भारणीयमच्या नावाखाली विज पुरवठा खंडित केला जात आहे. ऐन दिवाळी सणाच्या दिवसांमध्ये वारंवार विज पुरवठा खंडित.

हिंगोली : सेनगाव तालुक्यातील विजेचा प्रश्न कायम

sakal_logo
By
विठ्ठल देशमुख

सेनगाव (जिल्हा हिंगोली ) : तालुक्यातील हत्ता नाईक सर्कलमधील ब्रम्हवाडी गावामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून विज पुरवठा खंडित केल्याचा प्रकार पहायला मिळत. ऐन दिवाळी सनाच्या दिवशीसुध्दा विज पुरवठा खंडित केल्यामुळे नागरिकांची दिवाळी अंधारात साजरी होत असल्याचा आरोप ग्रामस्थांमधून केला जात आहे.

गेला महीना भरापासून तालुक्यातील ब्रम्हवाडी गावातील विज पुरवठा खंडित केला जात आहे. सकाळी पाच ते ११ वाजतापर्यंत भारणीयमच्या नावाखाली विज पुरवठा खंडित केला जात आहे. ऐन दिवाळी सणाच्या दिवसांमध्ये वारंवार विज पुरवठा खंडित होत असल्यामुळे गावकऱ्यांना दिवाळी सण अंधारात साजरी करण्याची वेळ आली आहे. ओव्हरलोड असल्यामुळे विज पुरवठा सुरळीत होत नसल्याचे कारण महावितरणच्या अधिकाऱ्याकडून देण्यात येत आहे.

शनिवारी लक्ष्मी पूजन होते. या दिवशी अनेकांच्या घरामध्ये कुटुंबीयांच्या उमस्थितीत लक्ष्मीपूजन करण्यात आले  मात्र विज पुरवठा खंडित झाल्यामुळे अनेक कुटुंबांना लक्ष्मी पूजन अंधारात पार पाडावे लागले.

हेही वाचा - हिंगोली : कळमनुरीत धुमस्टाईल दुचाकी चालविणाऱ्या युवकांची संख्या वाढली

एखाद्यावर थकबाकी असल्यास विज वितरण कार्यालयाकडून विज कनेक्शन तोडण्याचा इशारा दिला जातो. परंतु ग्रामस्थाना विजेचा वापरच करायला मिळाला नाही. विज बिल भरायचे कुठून असा प्रश्न गावकऱ्यांना पडत आहे. या सर्व प्रकार थांबवून संबंधितांची सखोल चौकशी करून ब्रम्हवाडी परिसरातील विज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी ग्रामस्थांमधून होऊ लागली आहे.

अनेक दिवसांपासून ब्रम्हवाडी परिसरातील विज पुरवठा खंडित केला आहे. भारनियमच्या नावाखाली आम्हाला अंधारात ठेवले जात आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांना भ्रमणध्वनीद्वारे बोलण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांच्याकडून कुठलाही प्रतिसाद मिळालेला नाही. ऐन दिवाळी सणाच्या दिवशी सुध्दा आमच्या गावात विज पुरवठा खंडीत केला जात आहे. त्यामुळे आमच्यावर दिवाळी सुध्दा अंधारात साजरी करण्याची वेळ आली आहे.

मिलिंद ठोके (ग्रामपंचायत सदस्य, ब्रम्हवाडी) : 

संपादन - प्रल्हाद कांबळे