esakal | हिंगोली : जिल्ह्यात शेतकरी सन्मानचे आठ लाख रुपये केले वसुल
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

केंद्र सरकारने सुरू केलेल्या पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेसाठी अपात्र असलेल्या शेतकयांनी लाभ घेतल्याचे निदर्शनास येत असल्याने त्यांच्याकडून रक्कम वसूल केली जात आहे . प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत दोन हेक्टर पर्यंत क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांना सहायता म्हणून वर्षाला सहा हजार रुपये निधी देण्यात येतो

हिंगोली : जिल्ह्यात शेतकरी सन्मानचे आठ लाख रुपये केले वसुल

sakal_logo
By
राजेश दारव्हेकर

हिंगोली : प्रधानमंत्री सन्मान किसान योजनेच्या लाभासाठी अपात्र असतानाही आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. अशा शेतकऱ्यांकडुन रक्कम वसूल केली जात आहे. जिल्ह्यात अशा ८४ शेतकन्यांकडून शेतकरी सन्मानाचे ८ लाख १४ हजार रुपये वसूल करण्यात आले आहेत. 

केंद्र सरकारने सुरू केलेल्या पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेसाठी अपात्र असलेल्या शेतकयांनी लाभ घेतल्याचे निदर्शनास येत असल्याने त्यांच्याकडून रक्कम वसूल केली जात आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत दोन हेक्टर पर्यंत क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांना सहायता म्हणून वर्षाला सहा हजार रुपये निधी देण्यात येतो. प्रत्येकी दोन हजार रुपये या प्रमाणे वर्षभरात हा निधी दिला जात आहे. जिल्ह्यात बहुतांश शेतकरी यासाठी पात्र ठरले. या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हा निधी जमा केला जात आहे. आत्तापर्यंत अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात सहा हप्ते जमा झाले आहेत. या योजनेचा गैरफायदा घेण्याचे प्रकार निदर्शनास आल्यानंतर केंद्र सरकारने बँक खात्याशी आधार जोडणी करण्याची सक्ती केली. ऑगस्टमध्ये याबाबतचा आदेश देण्यात आला होता. दरम्यान कर भरणारे शेतकरी या योजनेसाठी पात्र नाहीत. मात्र बँक खात्याशी आधार क्रमांक जोडणी करण्यात आल्यावर अशा कर भरणाऱ्या शेतकऱ्यांकडून रक्कम वसूल  करण्याचे निर्देश शासनाने दिले.

हेही वाचा -  हिंगोली : वारंगा फाटा येथे एकाच रात्री पाच दुकानांत चोरी, सव्वा लाखाचा ऐवज लंपास

त्यावरून हिंगोली जिल्ह्यातील अशा अपात्र शेतकऱ्यांकडून रक्कम केली जात आहे. इतर अपात्र शेतकऱ्यांकडूनही ही वसूल रक्कम वसूल केली जात आहे.

आत्तापर्यंत ८४ शेतकऱ्यांकडून रक्कम केली वसूल जिल्ह्यात शेतकरी सन्मान योजनेच्या लाभासाठी अपात्र असतानाही शेतकन्यांना लाभ घेतल्याचे स्पष्ट झाल्याने अशा शेतकऱ्यांना नोटीसा बजावण्यात आल्या. या शेतकऱ्यांना रक्कम परत करण्याचे आदेशप्रशासनाने दिले. त्यावरून अपात्र शेतकऱ्यांकडून ही रक्कम वसूल करण्यात आली. आत्तापर्यंत जिल्ह्यातील ८४ शेतकऱ्यांकडून ८ लाख १४ हजाररुपये वसूल करण्यात आले आहेत. त्यामध्ये औंढा नागनाथ तालुक्यातील १८ शेतकऱ्यांकडून १ लाख ६० हजार, वसमत तालुक्यातील २८ शेतकऱ्यांकडून २ लाख ८२ हजार तर कळमनुरी तालुक्यातील ३८ शेतकऱ्यांकडून ३ लाख ७२ हजार रुपये वसूल करण्यात आले आहेत.  शेतकरी सन्मान योजनेत जिल्ह्यातील २ हजार ३०८ आहेत. त्यामध्ये हिंगोली तालुक्यातील ३८२ , औंढा शेतकरी आयकर भरणारे अपात्र ठरविण्यात आले. नागनाथ ४१०. वसमत ५४६, कळमनुरी ५२३ तर सेनगाव तालुक्यातील ४४७ शेतकऱ्यांना किमान पहिला हप्ता मिळालेला आहे   अपात्र असलेल्या २३०८ शेतकयांना या योजनेतून दोन कोटी १६  लाख ५४ हजार रूपये वितरित करण्यात आले आहेत. यातील ८ लाख १४ हजार रूपये वसूल  करण्यात आले आहेत. अजून २ कोटी ८ लाख ४० वसूल करणे शिल्लक आहे.

संपादन - प्रल्हाद कांबळे

loading image
go to top