हिंगोली : इंधन दरवाढीच्या संभाजी ब्रिगेडचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे

राजेश दारव्हेकर
Tuesday, 9 February 2021

प्रधानमंत्री भारत सरकार,  मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य इंधन दर वाढ व वाढीव बिलाच्या विराधात मंगळवारी राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले

हिंगोली : इंधन दरवाढीच्या संभाजी ब्रिगेडचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवारी ( ता. नऊ) धरणे आंदोलन करत जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे.

प्रधानमंत्री भारत सरकार, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य इंधन दर वाढ व वाढीव बिलाच्या विराधात मंगळवारी राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले. यात हिंगोली जिल्हाधिकारी  कार्यालयासमोर संभाजी ब्रिगेडतर्फे  धरणे आंदोलन करण्यात आले. इंधन दरवाढ व वाढीव विज बिलाच्या विरोधात रस्त्यावर उतरुन धरणेआंदोलन करण्यात आले.

केंद्रातले सरकार व महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार दोघे मिळुन सर्व सामान्य जनतेची आर्थिक कुचंबना करीत आहेत. केंद्र सरकारने प्रचंड मोठी इंधन दरवाढ केली आहे. तर राज्य सरकार वाढीव विज बिल आकारणी करुन सर्व सामान्य जनतेचे खिसे कापले जात आहेत. विज बिलाच्या विरोधात भाजपचे आंदोलन व इंधन दरवाढीच्या विरोधात शिवसेना, महाविकास आघाडीचे आंदोलन म्हणजे राजकीय जॉइंट व्हेचर आंदोलन आहे. भाजपने इंधन दरवाढी विरोधात रस्त्यावर उतरावे व शिवसेने वाढीव विज बिलाचे विरोधात रस्त्यावर उतरावे. तर यांचा जनतेसाठी लढा आहे.असे म्हणता येईल.

महाविकास आघाडी सरकार व केंद्रातील भाजपचे सरकार हे पुतना मावशीच्या प्रेमासारख आहे. सर्व सामान्य, मध्यम वर्गीय गरीब जनतेचे यांना काही देणे घेणे नाही. वाढीव विज बिल व इंधन दरवाढ म्हणजे जिझिया कर आहे. तरी प्रधानमंत्री व मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य आपण दोघेही जबाबदार घटक असुन सर्व सामान्य जनतेची दिशाभुल न करता इंधन दरवाढ व वाढीव विजबिल माघे घेऊन सर्वसामान्य जनतेला दिलासा द्यावा अन्यथा संभाजी ब्रिगेड पुढील काळात यापेक्षा तिव्र आंदोलन छेडणार असल्याचे जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे. यावेळी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे, जिल्हाध्यक्ष सतिश पाटील महागावकरआदी सहभागी झाले होते.

 

संपादन- प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hingoli: Sambhaji Brigade of fuel price hike to be held in front of District Collector's Office hingoli news