हिंगोली : संत नामदेव महाराज यांच्या पालखीचा आज रिंगण सोहळा

संत नामदेव महाराज यांच्या पालखीचे आगमन रविवारी होत आहे.
हिंगोली - येथे तालुक्‍यातील नरसी येथील संत नामदेव महाराज पालखीचे रविवारी पहिले गोल रिंगण झाले.
हिंगोली - येथे तालुक्‍यातील नरसी येथील संत नामदेव महाराज पालखीचे रविवारी पहिले गोल रिंगण झाले.sakal

हिंगोली : नर्सी नामदेव येथील संत नामदेव महाराज यांची पालखी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरकडे रवाना झाली आहे. या पालखीचे पहिले रिंगण रविवारी (ता.१९) शहरातील रामलीला मैदानावर दुपारी दोन ते सहा यावेळी होत आहे. संत नामदेव महाराज यांच्या पालखीचे आगमन रविवारी होत आहे. या पालखीचे शहरातील अग्रसेन चौकात स्वागत होणार आहे. त्यानंतर ही पालखी इंदिरा चौक, गांधी चौक, महाराणा प्रताप चौक, जुन्या नगरपरिषदेजवळून रामलीला मैदानावर जाणार आहे. येथे दुपारी दोन ते सहा यावेळी पालखीचे पहिले रिंगण होणार आहे.

यावेळी खासदार हेमंत पाटील, आमदार तान्हाजी मुटकुळे, आमदार संतोष बांगर, आमदार विप्लव बाजोरिया, आमदार डॉ. प्रज्ञा सातव, माजी खासदार शिवाजी माने, माजी आमदार गजानन घुगे, भाजपचे जिल्हाध्यक्ष रामराव वडकुते, माजी उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण, सुधीर आप्पा सराफ, उद्योजक जगजित खुराणा, सुभाष बांगर, काशिनाथ बांगर यांची उपस्थित राहणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com