esakal | हिंगोली : सरपंच, ग्रामसेवकांच्या दोन दिवसीय तालुकास्तरीय प्रशिक्षणाला प्रारंभ, हिंगोली पंचायत समिती व यशदाचा पुढाकार

बोलून बातमी शोधा

file photo}

सरपंच व ग्रामसेवक यांच्यासाठी दोन दिवसीय तालुकास्तरीय प्रशिक्षणाला पंचायत समिती व यशदाच्या पुढाकारातून शनिवारी (ता.२७)  सुरुवात झाली आहे.

हिंगोली : सरपंच, ग्रामसेवकांच्या दोन दिवसीय तालुकास्तरीय प्रशिक्षणाला प्रारंभ, हिंगोली पंचायत समिती व यशदाचा पुढाकार
sakal_logo
By
राजेश दारव्हेकर

हिंगोली : येथील जिल्हा परिषदेच्या षट्कोनी सभागृहात राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान २०२१-२२ आमचा गाव आमचा विकास, ग्रामपंचायत वार्षिक विकास आराखडा याबाबत सरपंच व ग्रामसेवक यांच्यासाठी दोन दिवसीय तालुकास्तरीय प्रशिक्षणाला पंचायत समिती व यशदाच्या पुढाकारातून शनिवारी (ता.२७)  सुरुवात झाली आहे. रविवारी या प्रशिक्षणाचा समारोप होणार आहे.

तालुक्यातील ग्रामपंचायतच्या निवडणुका पार पडल्या ,नूतन सरपंच, उपसरपंच ,सदस्यांनी पदभार घेतला. त्यामुळे या नवीन पदाधिकाऱ्यांना ग्रामपंचायतीचा विकास आराखडा तयार करून गावाचा सर्वांगीण विकास कसा करता येईल यासाठी तालुकास्तरीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले असून प्रशिक्षण घेण्यात हिंगोली तालुका प्रथम ठरला आहे.आमचा गाव आमचा विकास अंतर्गत ग्रामपंचायत वार्षिक विकास आराखडा याबाबत ता.२७, ते ता.२८ असे दोन दिवसीय तालुकास्तरीय प्रशिक्षण सरपंच, ग्रामसेवक यांना दोन सत्रात दिले जात आहे. या प्रशिक्षणाचे प्रास्ताविक गटविकास अधिकारी डॉ. मिलिंद पोहरे यांनी केले तर पंचायत विस्तार अधिकारी विष्णू भोजे यांनी ग्रामसेवक, सरपंच यांनी विकास आराखडे कसे तयार करायचे याबाबत सविस्तर माहिती दिली.

यशदाचे प्रवीण प्रशिक्षक मनोज मोहरील, हरिभाऊ पट्टेबहादूर यांनी सरपंच, ग्रामसेवक यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, गावाचा विकास करताना प्रामुख्याने आरोग्य, शिक्षण, उपजीविका या बाबीकडे लक्ष देणे गरजेचे आहे.तसेच अंत्योदय मिशन, स्वच्छता पाणीपुरवठा, महिला व बालकल्याण, दिव्यांग व्यक्तीसाठी लाभ, महिला सबलीकरण व सक्षमीकरण मानव विकास निर्देशांक उंचावणे, गावे हागणदारीमुक्त  करण्यासाठी सार्वजनिक सौचालय व  वैयक्तिक सौचालयाचा वापर करणे, घनकचरा व्यवस्थापन करणे, शुद्ध पेयजल पाणीपुरवठा  करणे आदीं मुद्यावर सविस्तर माहिती दिली.१५ व्या वित्त आयोगामध्ये १.२०टक्के आराखडा तयार करणे ,मागील आराखड्याचा अभ्यास करून ताळेबंद करावा लागणार आहे.

गावात पडणारे पावसाचे पाणी शेतशिवारात जिरविण्यासाठी प्रयत्न करणे त्यामुळे विहिरी, बोअरची पाणीपातळी वाढण्यास मदत मिळून पाणीटंचाईचा प्रश्न मिटणार आहे. तसेच बंधीत निधी व अबंधीत निधी मधून कामे कशी करायची तर बंधीत निधीतून हागणदारीमुक्त ,स्वछ पाणी  पुरवठा, घनकचरा व्यवस्थापन, ही कामे ५० टक्के निधीतून करता येणार आहेत. तर अबंधीत ५० टक्के निधीतून आरोग्य विषयक कामे, उपजीविका म्हणजे बेरोजगार तरुणांच्या हाताला काम देणे, गावातील स्थलांतर रोखून कामे गावात उपलब्ध करून देणे अशा अनेक विषयांवर सखोल माहिती दिली. यावेळी तालुक्यातील १११ गावातील सरपंच ,ग्रामसेवक, अभियंता आदींची उपस्थिती होती. रविवारी या दोन दिवसीय प्रशिक्षणाचा समारोप होणार आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे