हिंगोली : रामलीला कार्यक्रमात सीता स्वयंवराचा प्रसंग

file photo
file photo

हिंगोली : येथील दसरा महोत्सव यावर्षी साधेपणाने सुरू असुन खाकीबाबा मठात होत असलेल्या रामलीला कार्यक्रमात बुधवारी ( ता. २१) सीता स्वयंवराचा प्रसंग झाला.

हिंगोली येथील दसरा महोत्सव यावर्षी कोरोना संकटामुळे अंत्यत साध्या पध्दतीने होत आहे. दरवर्षी शहरातील रामलीला मैदानावर होणारे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. दरवर्षी रामलीला मैदानावर दहा दिवस दररोज रात्री रामलीला तसेच नव्हान पारायण धुमधडाक्यात होतात. या जोडीला औद्योगिक प्रदर्शन देखील असते यात विविध वस्तू विक्रीची भांडारे यासह खाद्यपदार्थ व बच्चे कंपनीसाठी खेळाचे साहित्य उपलब्ध असते गगनचुंबी आकाश पाळणे, मोदकाकुआ हे दसरा महोत्सवाचे आकर्षक असते.

दररोज विविध धार्मिक कार्यक्रम

शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांची येथे कायम गर्दी असते दसरा महोत्सवाची रंगत नवदुर्गा महोत्सव वाढवितो शहरातील विशाल दूर्गा व त्रिशूल दुर्गा मंडळ अनेक वर्षी पासून देशातील प्रसिद्ध मंदिराच्या प्रतीकृती साकारुन व विद्युत रोषणाई मुळे भाविकांचे लक्ष वेधून घेतात तसेच शहरात गल्लोगल्ली देखील दुर्गा देवीची स्थापना केली जाते. येथे दररोज विविध धार्मिक कार्यक्रम व गरबा, दांडियाची धुम असते. यावर्षी मात्र सर्व कार्यक्रम थांबले आहेत.

रामलीला सादर करणारे उत्तर प्रदेशातील

काही मंडळाने देवीची स्थापना करून दररोज सकाळ संध्याकाळ सोशल डिस्टनस पाळत देवीची आरती होत आहे. तर रामलीला कार्यक्रम शहरातून वाहणाऱ्या कयाधु नदीच्या काठावर असलेल्या खाकीबाबा मठात साधेपणाने   कोरोना संदर्भातील नियमाचे पालन करीत रामलीला सुरु आहे. रामलीला सादर करणारे उत्तर प्रदेशातील सतना येथील रामलीला प्रमुख रामकुमार पांडे व कलावंत रामलीलेचे सर्व प्रसंग सादर करीत आहेत. आतापर्यंत यात आकाशवाणी, , तारका, मारीच राक्षस वध, अहिल्या उध्दार, सीता स्वयंवर व राजा दसरथ कैकई संवाद हा प्रसंग दाखविण्यात आला. सायंकाळी हे कार्यक्रम होत असल्याचे गणेश साहू व रामकुमार पांडे यांनी सांगितले.

संपादन - प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com