हिंगोली : विहिरीत पडलेल्या उदमांजर जातीच्या प्राण्याला वाचवण्यात युवकांना यश

file photo
file photo

हिंगोली : सेनगाव तालुक्यातील तांदुळवाडी येथे एका शेतात रविवारी (ता. १७) सकाळी विहीरीत पडलेले उदमांजर पक्षीमित्र, वनरक्षक, वनविभागाचे  मजुर व शेतकऱ्यांनी त्याला बाहेर काढून जखमी झाले नसल्याची खात्री करून जगंलात सोडून दिले.

सेनगाव तालुक्यातील तांदुळवाडी येथील शेतकरी विनोद चव्हाण यांच्या शेतातील विहिरीत उदमांजर पडल्याचे श्री. चव्हाण यांच्या लक्षात येताच त्यांनी पक्षीमित्र अनिल उटरवाड व वनरक्षक गणेश कुरा यांना माहिती दिली. त्यांनी ही माहिती वनविभागाला कळविली. त्यानंतर या सर्वांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच वनमजुर नाथराव होडबे, पांडुरंग होडबे, विठ्ठल होडबे हे देखील घटनास्थळी दाखल झाले. 

या सर्वांनी दोरखंडाच्या मदतीने बराच वेळ प्रयत्न करुन मदतीने उदमांजरास जीवनदान देत विहिरीतून पाण्याच्या बाहेर काढून त्याला कोठेही जखमी वगैरे काही झाल्याची पाहणी केली. जखम नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर या उदमांजराला जगंलात सोडून दिले. यामुळे उदमांजरास जीवदान मिळाले.

उदमांजराबाबत पक्षीमित्र अनिल उटरवाड म्हणाले याला छोटा मराठीत  भारतीय उदमांजर म्हणून ओळखले जाते. तो सर्वत्र आढळतो. छोटी उदमांजरे तीन फुट लांबीची व चार किलो वजनाची असतात. सामन्य उदमांजरापेक्षा त्यांचे शेपुट एक फुट असते.छोट्या उदमांजराचा रंग करडा तपकिरी असतो आणि पाठीवर बारीक व मोठया रेषा असतात. त्याच्या गळयावर आडव्या पट्ट्या असतात झुडपाखाली अथवा बिळे व भगदाडे यात ते आश्रय घेतात.झाडावर चढण्यात ती पटाईत असतात. खादय शोधण्यासाठी रात्री बाहेर पडत असल्याचे त्यांनी सांगितले.

संपादन- प्रल्हाद कांबळे

 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com