हिंगोलीत तळीरामांच्या आशा भंगल्या

hingoli photo
hingoli photo
Updated on

हिंगोली : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी देशी, विदेशी, बियर शॉपी बंद ठेवण्याचे आदेश सोमवारी (ता. चार) काढले आहेत. त्यामुळे तळीरामांची मात्र चांगलीच गैरसोय होत आहे.


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चाळीस दिवसांपासून जिल्ह्यात लॉकडाउन, संचारबंदी कायदा लागू आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यवसाय पूर्णपणे बंद आहेत. जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने पाच दिवस सर्व व्यवहार पूर्णपणे बंद ठेवण्यात आले होते.

जिल्हा स्तरावर परिस्‍थिती पाहून निर्णय

 त्यानंतर परत सोमवारपासून अत्यावश्यक सेवा सुरू करण्यात आल्या. शासनाने तीन मेपासून रेड झोन वगळता ऑरेंज व ग्रीन झोनमधील बियर शॉपी, देशी, विदेशी दारू विक्री व्यवसायाला परवानगी दिली आहे. तसेच जिल्हा स्तरावर जिल्हाधिकाऱ्यांनी परिस्‍थिती पाहून निर्णय घेण्याचे काळविले होते. 

तळीरामांचा हिरमोड

त्यानुसार जिल्ह्यातील कोरोनबाधितांची वाढती संख्या पाहता जिल्ह्यातील दारू दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी घेतला आहे. पुढील आदेश येईपर्यंत दारू दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे आनंदीत असलेल्या तळीरामांचा या निर्णयामुळे हिरमोड झाला आहे.

चढ्या दराने दारू विक्री

दरम्‍यान, जिल्ह्यात लॉकडाउन, संचारबंदी लागू असताना होलसेल व रिटेल बियर शॉपी, देशी, विदेशी मद्य विक्री दुकाने, ढाबे आदी ठिकाणे सील केले तरी दारूचा महापूर वाहत आहे. लॉकडाउनचा फायदा उचलत देशी दारू दोनशे ते अडीचशे रुपये प्रमाणे विकली जात आहे. विदेशी दारूही सहाशे ते सातशे रुपयांनी महाग विकली जात आहे.


कळमनुरीत दारू दुकानांपुढे तळीरामांच्या चकरा

कळमनुरी : दारू विक्रीची दुकाने सुरू होणार असल्याच्या निर्णयामुळे तळीरामांमध्ये आनंद व्यक्त केला जात होता. मात्र, सोमवारी (ता.चार) कळमनुरी शहरातील मद्य विक्रीचे दुकाने असल्याचे बंद पाहून तळीरामांचा मोठा भ्रमनिरास झाला. दुकाने सुरू होणार म्हणून अनेकांनी रांगा लावण्याकरिता सकाळपासूनच परिसरात येर झारा घालण्यास सुरवात केली होती. मात्र, दुकाने न उघडल्यामुळे अनेकांचा हिरमोड झाला.

मद्यविक्रीची दुकाने बंद 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एक ते दीड महिन्यापासून मद्यविक्रीची दुकाने बंद आहेत. त्यामुळे तळीराम सैरभैर झालेले पाहावयास मिळत होते. अनेकांनी मिळेल ती दारू उपलब्ध करून तल्लफ भागविण्याचा प्रयत्न चालविला आहे. शहर व ग्रामीण भागामधून मोठ्या प्रमाणावर गावठी दारू उत्पादित करून अव्वाच्या सव्वा भावाने विक्री करण्याच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे.

अनेकांचा भ्रमनिरास

 त्यामुळे शहरी भागातील तळीरामांनी गावठी दारू मिळविण्याकरिता आपला मोर्चा ग्रामीण भागाकडे वळविला आहे. एरवी शंभर रुपयाला लिटर मिळणारी गावठी दारू ७०० ते ८०० रुपयाला विकली जात आहे. सोमवारी शहरातील बियर बार व देशी दारूची दुकाने उघडतील या आशेने तळीरामांनी सकाळपासूनच तोंडाला रुमाल बांधून दुकानांसमोर रांगा लावण्यासाठी गर्दी केली. मात्र, दहा वाजल्यानंतर ही दुकाने उघडण्याबाबत कुठलीही हालचाल झाली नाही. त्यामुळे अनेकांचा भ्रमनिरास झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

MLA Kailas Patil's Demand Accepted; Government Assures Unconditional MGNREGA Subsidy
MLA Baburao Kadam Kohalikar demands retaining Hadgaon and Himayatnagar talukas under Nanded district instead of Kinwat
Private Money Lending License Bribe: Three Held in ACB Operation at Majalgaon
45-Day Spiritual Journey Begins: Sacred Bullock Pair to Lead Sant Eknath Maharaj’s Palkhi
Marathi News Esakal
www.esakal.com