हिंगोलीत भडका : पुन्हा 14 जवान पाॅझिटिव्ह, आकडा@90

राजेश दारव्हेकर
Tuesday, 5 May 2020

सोमवारी (ता.चार मे) रात्री प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्‍हा सामान्य रुग्णालयात कार्यरत  असलेल्या एका २४ वर्षीय परिचारीका यांना देखील कोविड-19 ची लागण झाल्याचे स्‍पष्‍ट झाले आहे.

हिंगोली : मंगळवारी (ता. पाच मे) सकाळी नव्याने एसआरपीएफचे एकूण १४ जवानांना कोविड-19 ची लागण  झाली आहे. त्यामुळे आता बाधितांची संख्या ८९ झाल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किशोरप्रसाद श्रीवास यांनी सांगितले.  

हिंगोली येथील ८२ एसआरपीएफ जवान व जालना येथील एक जवान असे 83 जवानाना कोरोनाची लागण झाली आहे. यात ८३ जवानांपैकी ३५ जवान मालेगाव (नाशिक) येथे कार्यरत होते तर ४८ जवान हे मुंबई येथे कार्यरत होते. सोमवारी (ता.चार मे) रात्री प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्‍हा सामान्य रुग्णालयात कार्यरत  असलेल्या एका २४ वर्षीय परिचारीका यांना देखील कोविड-19 ची लागण झाल्याचे स्‍पष्‍ट झाले आहे.

हेही वाचा - हिंगोलीला दुसरा झटका: २२ जवानांसह परिचारिकेला बाधा, आकडा @७६

जिल्‍हात कोविडचे एकूण ९० रुग्ण पॉझीटीव्ह आहेत. यात सर्वात प्रथम पॉझीटीव्ह आलेला एक रुग्ण बरा होवून निगेटीव्ह झाल्यामुळे त्‍याला डिस्‍चार्ज देण्यात आला आहे. व सद्यस्‍थितीतला ८९ रुग्ण पॉझीटीव्ह असल्याची माहिती डॉ. श्रीवास यांनी दिली. 

हिंगोलीतील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत की. अंत्‍यत महत्‍वाचे काम असल्याशिवाय कोणी घराबाहेर पडू नये व अत्‍यावश्यक सेवा वगळता इतरांनी घरीच थांबून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन डॉ. श्रीवास यांनी केले आहे.

हेही वाचाच - पाच दिवसानंतर मोकळीक मिळाली अन् तोबा गर्दी झाली... कुठे ते वाचा...

रिसाला बाजार भागात कंटेटमेंट झोन 
हिंगोलीतील रिसाला बाजार भागात राहणाऱ्या एका परिचारीकेला कोरोनाची बाधा झाल्याने हा परिसर आता कंटेन्मेंट झोन करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. सध्या हा परिसर सील करण्यात येत आहे. हिंगोलीत काल रात्री एसआरपीएफचे २२ जवान व एक परिचारीकेचा अहवाल पॉझीटीव्ह आल्यानंतर आज सकाळी पुन्हा १४ जवांनाचे स्‍वॅब पॉझीटीव्ह आले आहेत.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Outbreak In Hingoli: Again 14 Jawans Positive Figure @ 89