esakal | हिंगोली : साडेतीन कोटीतून तपोवन- गुंडा रस्ता होणार चकाचक
sakal

बोलून बातमी शोधा

road

हिंगोली : साडेतीन कोटीतून तपोवन- गुंडा रस्ता होणार चकाचक

sakal_logo
By
पंजाब नवघरे

वसमत (जिल्हा हिंगोली) : वसमत विधानसभा मतदारसंघातील परळी, तपोवन, गुंडा, करंजी, तेलगाव, रिधोरा या गावांच्या रस्त्याच्या कामांसाठी सीआयआरएफ अंतर्गत तब्बल तीन कोटी ४४ लाख १९ हजार निधी मंजूर झाला आहे. यासाठी हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून हे रस्ते चकाचक होणार आहेत.

वसमत मतदारसंघातील रस्त्यांची झालेली दयनीय अवस्था पाहता खासदार हेमंत पाटील यांनी सतत भेट घेऊन व पाठपुरावा करुन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना सदरील रस्त्यांची दयनीय अवस्था त्यांच्या निदर्शनास आणून देऊन रस्त्याच्या कामांना मंजूरी देऊन निधी उपलब्ध करुन देण्याचा प्रस्ताव सादर केला. श्री. गडकरी यांनी विनाविलंब दखल घेऊन केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत प्राधान्याने सदरील निधी मंजूर केला असल्याची माहिती खासदार हेमंत पाटील यांनी सकाळशी बोलताना सांगितले आहे.

हेही वाचा -वाळकेवाडी येथील राजु शेषराव वाळके (वय २२ ) ह्या तरुणाचा मंगळवारी (ता. २७) रोजी विवाह होणार होता.

सदरील कामे पूर्ण झाल्यावर या भागातील अनेक गावे एकमेकास जोडल्या जातील व यामुळे येथील जनतेला दळणवळणासाठी

मोठा फायदा होईल असेही त्यांनी सांगितले. याप्रमाणेच वसमत मतदार संघातील उर्वरित रस्त्यांच्या कामांच्या संदर्भातही सकारात्मक चर्चा झाली असून मतदारसंघातील प्रस्तावित केलेल्या कामांनाही लवकरच टप्याटप्याने मंजुरी देण्याचे व निधी उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन खासदार हेमंत पाटील यांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिल्याचे सांगितले आहे.

हा निधी मंजूर होताच शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सुनील काळे, तालुकाप्रमुख राजू चापके, नगराध्यक्ष श्रीनिवास पोरजवार, माजी सभापती तथा कुरुंद्याचे सरपंच राजेश इंगोले, शहरप्रमुख काशीनाथ भोसले, संभाजी बेले, विलास नरवाडे, दत्तराव भालेराव, बाबा अफूने यासह मतदार संघातील शिवसेनेचे पदधिकारी, शाखाप्रमुख, शिवसेनीक, युवा सैनिक यांनी खासदार हेमंत पाटील यांचे आभार मानले.

संपादन- प्रल्हाद कांबळे

loading image