हिंगोलीत तेरा मंडळात अतिवृष्टी, नदीकाठच्या गावांना सर्कतेचा इशारा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

हिंगोली जिल्ह्यात गेल्या 24 तासात पासून पावसाची रिपरिप सुरूच असून 30 पैकी 13 मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. कळमनुरी तालुक्यातील कोंढुर व शेवाळा या गावा जवळ कयाधू नदीच्या पुराचे पाणी आली आहे. आता कुठल्याही क्षणी गावांमध्ये पाणी शिरण्याचा धोका निर्माण झाला आहे .त्यामुळे, नदी व नाल्या काठच्या गावांना सतर्क राहण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी दिल्या आहेत.

हिंगोली: हिंगोली जिल्ह्यात गेल्या 24 तासात पासून पावसाची रिपरिप सुरूच असून 30 पैकी 13 मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. कळमनुरी तालुक्यातील कोंढुर व शेवाळा या गावा जवळ कयाधू नदीच्या पुराचे पाणी आली आहे. आता कुठल्याही क्षणी गावांमध्ये पाणी शिरण्याचा धोका निर्माण झाला आहे .त्यामुळे, नदी व नाल्या काठच्या गावांना सतर्क राहण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी दिल्या आहेत.

जिल्ह्यात मागील दोन दिवसापासून कमी-अधिक प्रमाणात पाऊस सुरू आहे. सोमवार तारीख 20 पासून पावसाने जोर पकडला आहे. रात्री जिल्ह्यात सर्वच ठिकाणी जोररदार पाऊस झाला आहे. या पावसामुळे कयाधू नदीला पूर आला असून नदीचे पाणी कळमनुरी तालुक्यातील कोंढुर व शेवाळा या गावालगत आले आहे. याशिवाय जिल्ह्यातील ओढे व नाले भरून वाहू लागले आहेत.

जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून आणखी पाऊस झाल्यास नदीच्या पुराचे पाणी गावात शिरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नदी व नाल्याकाठी असलेल्या 75 गावांना सतर्क राहण्याचा इशारा जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी दिला आहे. गावपातळीवरील तलाठी व ग्रामसेवकांना परिस्थितीवर लक्ष ठेवण्याच्या सूचनाही भंडारी यांनी दिल्या आहेत.

दरम्यान मागील 24 तासात जिल्ह्यातील 30 मंडळांपैकी तेरा मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. यामध्ये हिंगोली मंडळात 81 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. खांबाळा 65, माळहिवरा 78, सिरसम 77, बासंबा 82, कळमनुरी 90, नांदापूर 95, आखाडा बाळापुर 74, हयातनगर 74, औंढा नागनाथ 87, जवळाबाजार 79, येहळेगाव सोळंके 93, तर साळणा मंडळामध्ये 77 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात मागील अडीच महिन्यात एकूण 72 टक्के पाऊस झाला असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या सूत्रांनी सांगितले.

Web Title: In Hingoli there is heavy Raining in the circle