

Hingoli News
esakal
हिंगोली: शहरासह परिसरात अनेक विना क्रमांकाची वाहने चालविली जातात. एखाद्या वेळी अपघाताची घटना घडल्यास संबंधित वाहनांवर कारवाई करण्यासाठी अडचण निर्माण होते.
तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन झाल्यास सदर वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी अडसर ठरत असल्याने हिंगोलीत शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी विना क्रमांकाच्या वाहनांवर कारवाईसाठी धडक मोहीम सुरू केली आहे.