हिंगोली - आखाडा बाळापूरजवळ वाहतूक ठप

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 8 जून 2018

हिंगोली - आखाडाबाळापुर ते वारंगा मार्गावर आडा पाटी जवळ पूलावर मोठे यंत्र घेऊन जाणारा ट्रक मुख्य रस्त्यावर आडवा झाल्यामुळे शुक्रवारी (ता.८) सकाळी साडेपाच वाजल्या पासून वाहतूक ठप्प झाली आहे.

आखाडा बाळापुर ते वारंगा मार्गावर आडा पाटी येथे पूल आहे. आज सकाळी एका कंपनीचे यंत्र घेऊन जाणारा मोठा ट्रक पावसामुळे घसरला. हा ट्रेक रस्त्यावरच आडवा झाला. या मार्गावरून दुचाकी वाहन बाहेर काढले देखील कठीण झाले. मुख्य रस्त्यावरच ट्रक आडवा झाल्याने आखाडा बाळापुर कडून नांदेड कडे जाणारी व नांदेड कडून आखाडा बाळापुर कडे येणारी वाहने रस्त्यावरच अडकून पडली आहे. 

मागील तीन तासापासून वाहतूक ठप्प झाल्याने दोन्ही बाजूंनी वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. आखाडा बाळापुर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक व्यंकट केंद्रे यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न केले. त्यासाठी तीन जेसीबीच्या मदतीने रस्त्यावर आडवा झालेला ट्रक सरळ करण्याचे प्रयत्न सुरू होते. या भागात मोठा पाऊस असल्यामुळे या कामात अडथळा येऊ लागला आहे. मात्र पुढील अर्ध्या-एक तासामधे वाहतूक सुरळीत होईल असे सहाय्यक पोलीस निरीक्षक व्यंकट केंद्रे यांनी सांगीतले.

Web Title: Hingoli - Traffic stop near Akhada Balapur