
राष्ट्रीय लाळ्या, खुळकत रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत राज्यभरात लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे.
हिंगोली : राष्ट्रीय लाळ्या खुळकत रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हाभरात तीन डिसेंबर अखेर पशुसंवर्धन विभागामार्फत शेतकऱ्यामध्ये जनजागृती करून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन जवळपास दोन लाख ३ हजार ५५ जनावरांना लसीकरण केल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाचे पशुसंवर्धन अधिकारी डॉ. जावळे यांनी दिली.
राष्ट्रीय लाळ्या, खुळकत रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत राज्यभरात लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. त्यानुसार जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन उपयुक्त डॉ. लक्ष्मण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पशुसंवर्धन अधिकारी, पशुधन अधिकारी हा लसीकरण कार्यक्रम राबवित आहेत. यामध्ये शेतकऱ्यांच्या गोठ्यात जाऊन गाय व म्हैस वर्गीय जनावरांना लाळ्या खुळकत रोगा पासून रोखण्यासाठी लसीकरण मोहीम यशस्वी पणे राबविली जात आहे.यामध्ये जनावरांच्या कानाला आधार स्वरूपी ओळख म्हणून ट्यागिंग केले जाते व रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी लसीकरण केले जात आहे.
हेही वाचा - नांदेड : जखमी चिमुकल्या अनुष्काच्या मदतीला धावले महामार्ग पोलिस
जनावरांना लसीकरण करताना पशुधन अधिकाऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. काही पशुधन अधिकाऱ्यांना जनावरांच्या लाथाने जखमी होण्याची वेळ आली तरी अशा परिस्थितीत पाय जाय बंदी होऊनही शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन लसीकरण करीत आहेत. ता.३ डिसेंबर अखेर दोन लाख ३ हजार ५५ जनावरांना लसीकरण करण्यात आले असून आणखी ही मोहीम सुरू असल्याचे डॉ. जावळे यांनी सांगितले.तसेच ज्या नागरिकांनी आपल्या पशुचे लसीकरण केले नाही त्यांनी लसीकरण करून घेण्याचे आवाहन ही पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात आले आहे.
संपादन - प्रल्हाद कांबळे