Hingoli : वसमतमध्ये एकाचा चाकूने भोसकून खून, आरोपी फरार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hingoli  CRIME NEWS

Hingoli : वसमतमध्ये एकाचा चाकूने भोसकून खून, आरोपी फरार

वसमत : येथील बसस्थानक समोरील एका हॉटेल जवळ एका जेष्ठ नागरीकाचा चाकूने भोसकून खून झाल्याची घटना मंगळवारी ता. १८ सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. अंबाजी गायकवाड (६०,मुळ रा. गणेशपुर) असे मयताचे नांव असल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र खूनाचा नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत तालुक्यातील गणेशपुर येथील अंबाजी गायकवाड हे औरंगाबाद येथे राहतात. काही दिवसांपुर्वीच ते वसमत येथे आले होते.

हेही वाचा: Hingoli : गणेशवाडीतील अतिक्रमणांवर हातोडा

आज सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ते बसस्थानकासमोरील पवन हॉटेल जवळ आले होते. यावेळी दुचाकीवर आलेल्या दोन ते तीन जणांनी त्यांच्या जवळ येऊन त्यांच्या पोटावर चाकूने वार केले. त्यानंतर आरोपींनी पलायन केले. अचानक झालेल्या हल्लयामुळे गायकवाड यांना मदतीसाठी ओरडण्याची संधीही मिळाली नाही. पोटात चाकूने चार वार झाल्यामुळे ते जागीच कोसळले.या प्रकारानंतर तेथे मोठ्या संख्येने जमाव एकत्र झाला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वसमत शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक चंद्रशेखर कदम, जमादार शंकर हेंद्रे, शेख नय्यर, संदीप चव्हाण, भगीरथ सवंडकर यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

हेही वाचा: Hingoli : रेशनचे धान्य काळ्या बाजारात

पोलिसांनी गायकवाड यांना उपजिल्हा रुग्णालयात नेले. मात्र त्यापुर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकिय अधिकाऱ्यांनी जाहिर केले.दरम्यान, जून्या वादातून हा प्रकार झाला असावा अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून पोलिसांनी दुचाकीवर आलेल्या आरोपींचा शोध सुरु केला आहे. त्यासाठी पोलिसांनी पथकेही वसमत शहरासह परिसरात पाठविण्यात आली आहेत. या प्रकरणी अद्याप पर्यंत कुठल्याही प्रकाराचा गुन्हा दाखल झाला नाही.