हिंगोली : बेकायदेशीर जीवंत काडतुससह शस्त्र साठा जप्त

विठ्ठल देशमुख
Friday, 4 December 2020

सेनगाव तालुक्यातील बोडखा शिवारात गुन्हा करण्याच्या उद्देशाने शेतात लपवून ठेवलेला शस्त्रसाठा आज शुक्रवारी पहाटे चारच्या सुमारास जप्त करण्यात आला असून या प्रकरणात पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले

सेनगाव (जिल्हा हिंगोली) : तालुक्यातील बोडखातांडा शिवारात बेकायदेशीर शस्त्र जीवंत काडतुससह शस्त्रसाठा बाळगणाऱ्या इसमाच्या घरावर छापा टाकून हिंगोली पोलिसांनी शुक्रवारी (ता. चार) शस्त्रसाठ्यासह दोघांना ताब्यात घेतले आहे.

सेनगाव तालुक्यातील बोडखा शिवारात गुन्हा करण्याच्या उद्देशाने शेतात लपवून ठेवलेला शस्त्रसाठा आज शुक्रवारी पहाटे चारच्या सुमारास जप्त करण्यात आला असून या प्रकरणात पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. सेनगाव तालुक्यातील व औंढा पोलीस स्थानक अंतर्गत येणाऱ्या बोडखा तांडा गावच्या शिवारात काही जणांनी शस्त्रसाठा लपविल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंडित कच्छवे यांना मिळाल्यानंतर शुक्रवारी पहाटे चारच्या सुमारास पोलीस अधीक्षक राकेश कालासगर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने गावात रहात असलेल्या धनसिंग उर्फ भाऊ राठोड व नवनाथ राठोड रा. बोडखा तांडा यांच्या घरावर छापा टाकला असता त्यांच्या घरात लपविण्यात आलेले एक पिस्टल, एक बंदूक, तीन जिवंत काडतूस, गनं पावडर, छर्रे व खंजीर असा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला.

हेही वाचा हिंगोली : जिल्ह्यात साडेचार हजार गर्भवती मातांनी घेतला मातृवंदना योजनेचा लाभ

प्रकरणातील आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांची कसून चौकशी सुरु असल्याची माहिती पोलिस निरीक्षक कच्छवे यांनी दिली. या कारवाईत पोलिस उपनिरीक्षक शिवसांब घेवारे,  बाबासाहेब खर्डे, पोलिस कर्मचारी शंकर जाधव, विलास सोनवणे, डुकरे अर्जुन पडघम, रुपेश धाबे, महेश बंडे, शेख शफी, आकाश टपरी आदींचा सहभाग होता.

 

संपादन - प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hingoli: Weapons seized with illegal live cartridges hingoli news

Tags
टॉपिकस