हिंगोलीत तरुणाचा शस्त्राने वार करून निर्घृण खून

पोलिसांनी तिघांना घेतले ताब्यात
खून
खूनsakal

हिंगोली : शहरातील तलाब कट्टा भागात मुलीच्या छेडछाडीची वरुन एका तरुणाचा गुप्ती व खंजीराने वार करून निर्घृण खून केल्याची घटना घडली असुन या बाबत मंगळवारी ता.१९ सकाळी तीघाविरुध्द शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हिंगोली शहरातील तलाव कट्टा भागात शुभम राजे व बबलू धाबे यांच्यामध्ये काही दिवसांपूर्वी मुलीच्या छेडछाडी वरून वाद निर्माण झाला होता. परंतु तो वाद लगेचच मिटला. दरम्यान सोमवारी या वादाचा बदला घेण्यासाठी बबलू धाबे व त्याच्या सोबत अन्य दोघे जण रात्री साडेनऊ ते दहा वाजण्याच्या सुमारास तलाबकट्टा परिसरात आले. यावेळी त्यांनी शुभम राजे वय २३ याला बोलून घेतले त्याच्यावर गुप्ती , खंजीर लोखंडी पाइपने सपासप वार केले. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे शुभम जागीच कोसळला. त्यानंतर ते तिघेही फरार झाले. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली.

घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस अधिक्षक यतिश देशमुख , पोलीस निरीक्षक पंडित कच्छवे, गुन्हे शाखेचे निरीक्षक उदय खंडेराय, उपनिरीक्षक शिवसांब घेवारे , व्ही. पी.विठूबोणे, जमादार संजय मार्के , शेख मुजीब , शेख अमजद , शेषराव पोले यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेतली. आरोपीच्या अटकेसाठी पथक रवाना केले या पथकाने पहाटे तीन वाजता तिघांनाही खुशाल नगर भागातून ताब्यात घेण्यात आले आहे.याप्रकरणी शुभम राजे यांच्या आई शोभा राजे यांच्या तक्रारीवरून हिंगोली शहर पोलीस ठाण्यात बबलू धाबे व अन्य दोघांवर खुनाचा गुन्हा दाखल झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com