esakal | हिंगोली जिल्हा परिषदेमध्ये ५० टक्के कर्मचारी उपस्थित राहणार

बोलून बातमी शोधा

जिल्हा परिषद हिंगोली
हिंगोली जिल्हा परिषदेमध्ये ५० टक्के कर्मचारी उपस्थित राहणार
sakal_logo
By
राजेश दार्वेकर

हिंगोली : कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागातील कर्मचाऱ्यांना आलटून पालटून उपस्थित राहण्याचे आदेश उपमुख्य कार्यकारी अधिकारी धनवंतकुमार माळी यांनी गुरुवारी ( ता. २२) काढले आहेत.

जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्या वाढत आहे, प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन विविध उपाययोजना करीत असून यापूर्वी राज्य शासनाने शासकीय कार्यालयातील उपस्थिती ५० टक्के ठेवण्याचे आदेश जारी केले होते. जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन रुचेश जयवंशी यांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाय योजना करण्याच्या सूचना केल्यानुसार कार्यालयातील उपस्थिती नियंत्रित करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार जिल्हा परिषदेचे सीईओ राधाबीनोद शर्मा जिल्हा परिषदे अंतर्गत विभागातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती, कामाचा व्याप लक्षात घेता आवश्यकतेनुसार कर्मचाऱ्यांची ५० टक्के उपस्थिती बंधनकारक करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

हेही वाचा - जागतीक वसुंधरा दिन : ओसाड पडतेय वसुंधरा; झाडांच्या बेसुमार कत्तली ः पाण्याचा अपव्यय आणि वायुप्रदूषणही

त्यानुसार जिल्हा परिषदेचे सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी धनवंतकुमार माळी यांनी कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना २३ ते ३० एप्रिल या कालावधीत आलटून पालटून कार्यालयात उपस्थित राहून कार्यालयीन कामकाज करण्याचे आदेश काढले आहेत. तसेच कर्मचाऱ्यांना उपस्थित राहण्याच्या सूचना प्राप्त झाल्यास त्यांनी आपला संपर्क क्रमांक, इमेल पत्ता कार्यालयाकडे उपलब्ध करुन द्यावा. कोणताही कर्मचारी मुख्यालय सोडून बाहेरगावी जाणार नाही, याची दक्षता घ्यावी, कार्यालयात उपस्थित राहण्याच्या सूचना मिळताच कर्मचार्यांनी कार्यालयात उपस्थित राहणे गरजेचे आहे. यामुळे कोरोना संसर्गही रोखता येणार असून या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना आलटून पालटून कामे करता येणार असल्याने कार्यालयात गर्दी कमी होण्यास मदत मिळेल.

संपादन- प्रल्हाद कांबळे