हिंगोलीच्या विघ्नहर्ता चिंतामणीचा मोदकोत्सव कोरोनामुळे रद्द

हिंगोलीचा विघ्नहर्ता चिंतामणी 
हिंगोलीचा विघ्नहर्ता चिंतामणी 
Updated on

हिंगोली - शहरातील गोड्डीपीर भागातील चिंतामणी गणपतीची नवसाला पावणारा विघ्नहर्ता गणपती म्हणून राज्यभरासह तेलंगणा, आंध्र प्रदेश, पंजाब, गुजरातमध्ये ओळख आहे. त्यामुळे अनंत चतुर्दशीला लाखो भाविक नवसाचे मोदक घेऊन दाखल होतात. यावर्षी मात्र कोरोना संसर्गाच्या संकटामुळे अडचणी आल्यामुळे यावर्षी विघ्नहर्ता चिंतामणीचा मोदकोत्सव रद्द करण्यात आला आहे. 

यंदा हिंगोलीच्या विघ्नहर्ता चिंतामणीचा अनंत चतुर्दशीला मंगळवारी (ता. एक सष्टेंबर) होणारा मोदकोत्सव रद्द करण्यात आला आहे. मोदक वाटपाची गेल्या अनेक वर्षापासूनची परंपरा यंदा खंडित झाली आहे. यंदा फक्त मंगळवारी अनंत चतुर्दशीला मानाचे एक हजार एक मोदकांचा नैवेद्य चिंतामणी विघ्नहर्त्यास दाखविला जाणार आहे.

नवस फेडण्यासाठी येतात भाविक
दर महिन्याला चतुर्थीला चिंतामणी गणेशाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होते. त्यात गणेशोत्सवाच्या काळात मोठी भर पडते. येथे दरवर्षी अनंत चतुर्दशीला मोदक वाहण्यासाठी मोठी गर्दी होते. यात १०८ मोदकांपासून ते एक हजार आठ मोदकांचा प्रसाद भाविक वाटप करतात. ज्या भाविकांनी नवस बोलला ते भाविक चिंतामणीजवळील मोदक घरी नेऊन त्याची वर्षभर पूजा करतात. एका बंद डब्यात ठेवून त्याची पूजा केली जाते व नवस फेडण्यासाठी हे मोदक अनंत चतुर्दशीला आणले जातात. महापूजेनंतर त्याचे वाटप केले जाते. यासाठी महाराष्ट्रासह इतर राज्यांतील भाविक येथे दाखल होतात. 

चिंतामणीला अभिषेक
या दिवशी येथे सकाळी अकरा वाजता कयाधू नदीवर कावड घेऊन २५ ते ३० भाविक जातात. कावडीने पाणी आणून चिंतामणी गणेशाचा अभिषेक केला जातो. त्यानंतर दुपारी चार वाजता महापूजा करून पाच वाजता महाआरती होते. त्यानंतर नवसाच्या मोदकांचे वाटप केले जाते. यावेळी बाहेरगावाहून येणाऱ्या भाविकांची संख्या अधिक असल्याने सकाळपासूनच शहरातील सर्व रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात येतात. यंदा मात्र कोरोनामुळे भाविक येणार नाहीत. रमाकांत मिस्किन हे दरवर्षी एक हजार मोदक वाटप करतात.

कोरोना संकटामुळे अडचणी 
गणेशोत्सवात दहा दिवस भाविकांची मोठी गर्दी असते. अनंत चतुर्दशीला शहरात येणाऱ्या भाविकांना दर्शन रांगेपर्यंत नेण्यासाठी आॅटोरिक्षा संघटनेतर्फे मोफत व्यवस्था केली जाते. पोलिस प्रशासनातर्फे चोख बंदोबस्त ठेवण्यात येतो. अनंत चतुर्दशीला लाखो भाविक विघ्नहर्ता चिंतामणी गणपतीचे दर्शन घेऊन मोदकोत्सवात सहभागी होतात. यावर्षी मात्र कोरोना संकटामुळे अडचणी आल्या आहेत. यावर्षी विघ्नहर्ता चिंतामणीचा मोदकोत्सव कोरोना संकटामुळे रद्द करण्यात आला आहे. मंगळवारी (ता. एक) अनंत चतुर्दशीला मानाचे एक हजार एक मोदकांचा नैवेद्य चिंतामणी विघ्नहर्त्यास दाखविला जाणार आहे. तसेच मंदिरासमोर होणारा अथर्वशीर्ष वाचनाचा कार्यक्रम रद्द करून तो आपआपल्या घरी करण्यात येणार आहे.

संपादन - अभय कुळकजाईकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com