esakal | खासदार हेमंत पाटलांमुळे ४० गावांचा पीकविमा भरण्याचा मार्ग मोकळा
sakal

बोलून बातमी शोधा

खासदार हेमंत पाटील

खासदार हेमंत पाटलांमुळे ४० गावांचा पीकविमा भरण्याचा मार्ग मोकळा

sakal_logo
By
राजेश दारव्हेकर

हिंगोली : हिंगोली Hingoli जिल्ह्यातील हिंगोली, कळमनुरी Kalamnuri, वसमत Vasmat आणि सेनगाव Sengaon तालुक्यातील ४० गावांना ऑनलाइन पीकविमा भरण्याबाबत अडचणी येत होत्या. याबाबत खासदार हेमंत पाटील MP यांनी जिल्हा अग्रणी बँक, जिल्हा कृषी अधीक्षक आणि संबंधित विमा कंपनीकडे लेखीपत्र दिल्यानंतर त्या ४० गावांचा पीकविमा Crop Insurance भरण्याचा मार्ग सुकर झाला आहे. त्यांना ऑफलाईन पद्धतीने पीकविमा भरता येणार आहे. श्री.पाटील यांच्या पाठपुराव्याने आणि कार्यतत्परतेमुळे पिकविम्यापासून वंचित राहणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाल्याने शेतकऱ्यांमधून Farmer आनंद व्यक्त केला जात आहे. शेतकऱ्यांसाठी खासदार पाटील सदैव पुढाकार घेऊन न्याय मिळवून देत असतात. अगोदरच निसर्गाच्या लहरीपणामुळे आणि शासनाच्या व पीकविमा कंपनीच्या जाचक अटीमुळे शेतकरी हैराण आहेत. जिल्ह्यातील हिंगोली, कळमनुरी, वसमत आणि सेनगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना याचा चांगलाच फटका बसला.hingoli's forty villages could fill up crop insurance, mp hemant patil come forward for farmers glp88

हेही वाचा: औरंगाबादकर तरुणाचे मोठे यश, पटकावले २५०० युएस डाॅलरचे पारितोषिक

सध्या खरीप हंगाम सुरु झाल्यानंतर शेतकऱ्यांनी पीकविमा भरण्याची घाई केली होती. परंतु हिंगोली जिल्ह्यातील ४० गावांची नावे पिकविम्याच्या ऑनलाइन प्रणालीमध्ये दाखवत नसल्याने या गावातील शेतकरी बांधव हवालदिल झाले होते. याबाबत श्री.पाटील यांच्याकडे अनेक तक्रारी आल्या. त्यानंतर त्यांनी तातडीने याची दखल घेऊन जिल्हा प्रशासन, कृषि विभाग आणि संबंधित पीकविमा कंपनी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केल्यांनतर तात्काळ यावर कारवाई करण्यात आली आणि चारही तालुक्यातील गावांचा पीक विमा भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.खासदार पाटील यांनी पीकविमा भरण्याची तारीख संपण्याच्या आत पीकविमा भरता येणार असल्याने शेतकरी बांधव आनंद व्यक्त करित आहेत.

हेही वाचा: Aurangabad : औरंगाबादेत मुसळधार पाऊस, रस्त्यांवर पाणीच पाणी

ज्या गावांचा समावेश ऑनलाइन प्रणालीमध्ये करण्यात आला नव्हता, त्यामध्ये हिंगोली तालुक्यातील गणेशवाडी , झुलुका , जांभरून जहांगीर , जांबवाडी, डोंगी , दुधेरी , धोतरवाडी , बुकनवाडी , मल्हारवाडी, राजवाडी , वंजारवाडी, ससेवाडी, सिंगारवाडी, हिंगोली, जऊळका , भुली , घोगरतळा , गाडीबोरी , सेनगाव तालुक्यातील बरडा , कारला, मकोडी , मांगनवाडी , वसमत तालुक्यातील रुखी, आंबा, मुरुंबा, आमनाथ , संगमेश्वर , भाटेगाव, रेऊळगाव , चिंचोली तर्फे माळवटा, कळमनुरी तालुक्यातील गणगाव, खारवी , रहेमापूर, कृष्णापूर तर्फे जवळा , देवदरी , धुमका , गारोळ्याची वाडी, वसपांगरा, चिंचोर्टी ही गावे आहेत.

loading image