esakal | औरंगाबादकर तरुणाचे मोठे यश, पटकावले २५०० युएस डाॅलरचे पारितोषिक
sakal

बोलून बातमी शोधा

औरंगाबाद : अनुप भदे याचा प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करताना आमदार सतीश चव्हाण. यावेळी  प्राचार्य डॉ. उल्हास शिऊरकर, प्रा. संजय कल्याणकर, मिलिंद भदे, वृषाली भदे आदी.

औरंगाबादकर तरुणाचे मोठे यश, पटकावले २५०० युएस डाॅलरचे पारितोषिक

sakal_logo
By
संदीप लांडगे

औरंगाबाद : सिंगापूर येथील झिलिका प्रा. लि. व बंगळूरु येथील ब्लॉक चेन इंडिया Blackchain India यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘१०० डेज ऑफ कोव्हर्ट’ 100 days pf cohort या राष्ट्रीय चर्चासत्रात देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालयातील Deogiri Engineering College संगणकशास्त्र Computer Science विभागाचा विद्यार्थी अनुप भदे याने २५०० यूएस डॉलरचे तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले आहे. लोणेरे (जि. रायगड) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाशी Babasaheb Ambedkar Technology University सलंग्न असलेल्या अभियांत्रिकी महाविद्यालयात संगणकशास्त्र विषयाच्या अंतिम वर्षात अनिवार्य विषयांबरोबच वैकल्पिक विषयांची सांगड घालून देण्यात आली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीचा वैकल्पिक विषय घेता येतो. अनुप भदे याने ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी हा विषय निवडला होता. त्यात विषयामध्ये आणखी रस निर्माण झाल्याने अनुप भदे याने ‘१०० डेज ऑफ कोव्हर्ट’ या ऑनलाईन राष्ट्रीय चर्चासत्रात भाग घेत त्याच्या संघाने १०० दिवसांच्या या चर्चासत्रात ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीचा प्राथमिक अभ्यास करत ज्ञान घेतले. यातून एक सोशल ट्रेडिंग प्लॅटफॉर्म तयार करून त्याचे प्रात्यक्षिक सादर केले. aurangabad's student anup bhade won two thousand and five hundred us dollar award glp88

हेही वाचा: आईने मिळविला न्याय, मुलाच्या मारेकऱ्यांवर गुन्हे दाखल

त्याच्या या प्रात्यक्षिकाला २५०० यूएस डॉलरचे (भारतीय १, ८६, ४०० रु.) तृतीय क्रमांकाचे पोरितोषिक मिळाले. या यशाबद्दल संस्थेचे सरचिटणीस आमदार सतीश चव्हाण यांच्या हस्ते सोमवारी (ता.१२) अनुपचा आई-वडीलांसह सत्कार करण्यात आला. यावेळी अनुपचे वडील मिलिंद भदे, आई वृषाली भदे, प्राचार्य डॉ.उल्हास शिऊरकर, प्रा. संजय कल्याणकर यांची उपस्थिती होती. या चर्चासत्रासाठी अनुपला विभागप्रमुख प्रा. संजय कल्याणकर, प्रा. पंकज दुरोळे यांचे मार्गदर्शन मिळाले. अनुपच्या या यशाबद्दल मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रकाश सोळंके, उपाध्यक्ष शेख सलीम, विवेक भोसले, डॉ.सत्यवान धोंडगे, प्रा. प्रकाश तौर, डॉ. राजेश औटी, डॉ. गजेंद्र गंधे, डॉ. सुनील शिंदे, प्रा. रूपेश रेब्बा, प्रा. अच्युत भोसले, प्रा. अमर माळी आदींनी अभिनंदन केले आहे.

हेही वाचा: सुखद! पाच महिन्यानंतर महिलेला मिळाले चोरीला गेलेले मंगळसूत्र

विद्यार्थ्यांच्या सुप्तगुणांना वाव

महाविद्यालयात संगणकशास्त्र अंतिम वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना अनिवार्य विषयाबरोबर सर्वच वैकल्पिक विषय शिकवले जातात. विद्यार्थ्यांच्या सुप्तगुणांना वाव देण्यासाठी देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालय नेहमीच पुढाकार घेतला असल्याचे प्राचार्य डॉ. शिऊरकर यांनी सांगितले.

loading image