लातूरच्या ‘हिरकणीचं बिऱ्हाड’चा श्रीलंकेत गौरव

Hirkanicha Birhad books inauguration ceremony in sri lanka
Hirkanicha Birhad books inauguration ceremony in sri lanka

लातूर : पुस्तकाचा वेगवेगळ्या भाषेत अनुवाद होणे आणि त्या अनुवादीत पुस्तकाचा मुळ लेखकाच्या उपस्थितीत प्रकाशन सोहळा होणे हा लेखकासाठी गौरवाचाच क्षण असतो. असाच गौरवाचा क्षण लातूरमधील लेखिका सुनीता अरळीकर यांना अनुभवायला मिळत आहे. त्यांच्या ‘हिरकणीचं बिऱ्हाड’ या आत्मचरित्राचा श्रीलंकेच्या सिंहला भाषेत अनुवाद झाला असून त्याचे प्रकाशन उद्याच (ता. 22) कोलंबो येथे होणार आहे. त्यासाठी त्यांना कोलंबो येथे निमंत्रित करण्यात आले आहे.

अरळीकर यांचे ‘हिरकणीचं बिऱ्हाड’ हे आत्मचरित्र वाचताना जगण्यासाठी लढलेली टोकाची लढाई पानापानांतून व्यक्त होते. मराठी भाषेतील या पुस्तकाची आजवर अनेक साहित्य संस्थांनी दखल घेतली आहे. या पुस्तकाचा हिंदी, उर्दू, इंग्रजी या भाषेत अनुवादही झाला आहे. वाचकांचा उत्तम प्रतिसाद या पुस्तकाला मिळाला आहे. श्रीलंकेतील लेखिका अनुला डिसिल्वा यांनाही या पुस्तकातील संघर्ष खुनावत होता. त्यामुळेच त्यांनी सिंहला या आपल्या मातृभाषेत हे पुस्तक अनुवादित केले आहे. श्रीलंकेच्या पश्चिम किनार्‍यावर वसलेल्या कोलंबो शहरातील पब्लिक लायब्ररीमध्ये या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा होणार आहे.

‘हिरकणीचं बिऱ्हाड' हे मराठी भाषेतील मुळ पुस्तक पुण्यातील अक्षर मानव प्रकाशनाने प्रकाशित केले आहे. यात जगण्याचा टोकाच्या संघर्षाचे आणि त्यानंतरच्या स्वाभाविक प्रगल्भतेचे दर्शन अरळीकर यांनी घडवले आहे. शिवकांता माने ते सुनीता अरळीकर हा प्रवास मांडताना जातीत घट्ट विणलेली समाजव्यवस्था आणि त्या समाजव्यवस्थेशी आपल्या ताकदीनुसार केलेला झगडा या पुस्तकात अरळीकर यांनी शब्दबद्ध‌ केला आहे. समाजाच्या अलिखित उतरंडीचे भीषण दर्शन पानापानांवर घडते. जन्मापासून सोसावा लागलेला छळ, जन्मदात्याचा विरोध, पावलोपावली दबा धरून बसलेली संकटे आणि या साऱ्यांवर मात करून शिकण्याची ऊर्मी सहज सोप्या भाषेत त्यांनी मांडली आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com