औरंगाबाद - छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजोबांची समाधी दुर्लक्षित 

राजेभाऊ मोगल
गुरुवार, 24 मे 2018

औरंगाबाद - छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांच्या वेरूळ येथे असलेल्या समाधी परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. हे समाधीस्थळ स्वच्छ व सुशोभित करण्यात यावे, अशी मागणी किसान व वॉटर आर्मीचे संस्थापक व सामाजिक कार्यकर्ते प्रफुल्ल कदम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. 

याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले, की वेरूळ येथील या स्मारकास शासनाने मोजणी करून तारेचे कुंपण करून दिल्यास सुशोभीकरण व संवर्धनाची सर्व जबाबदारी आम्ही स्वत: घेऊ. घृष्णेश्वर मंदिरासमोरील समाधीजवळ असलेले घाणीचे साम्राज्य तत्काळ दूर करावे. त्याचबरोबर औरंगाबाद जिल्हाधिकारी यांनाही लेखी निवेदन पाठवून फोनवर चर्चा केली आहे. 

जगप्रसिद्ध वेरूळ लेणी व घृष्णेश्वर मंदिरासमोरच मालोजीराजे भोसले यांची उत्कृष्ट बांधकाम असलेली समाधी आहे. या समाधीसभोवताली अस्वच्छता असून, मराठी माणसासाठी ही लाजिरवाणी बाब आहे. रस्त्यालगत असलेल्या या समाधीजवळून हजारो भाविक व पर्यटक ये-जा करतात; परंतु घाणीमुळे या समाधीकडे फारसे कुणाचे लक्षही जात नाही. तेथे साधा फलकसुद्धा लावलेला नाही. या समाधीस्थळाचे ऐतिहासिक, पुरातत्त्वीय, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक महत्त्व लक्षात घेऊन शासनाने यामध्ये त्वरित संवर्धन व सुशोभीकरणाची जबाबदारी घ्यावी. 

मालोजीराजे भोसले यांनी शिखर शिंगणापूर मंदिराचा जीर्णोद्धार केला व दुष्काळी भागात मोठा तलाव बांधला, याची माहिती तमाम शिवप्रेमीपर्यंत पोचायला हवी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्‍त केली. या समाधीचा प्रश्‍न आता देशपातळीवर ऐरणीवर आणू, असे श्री. कदम यांनी निवेदनात म्हटले आहे.

Web Title: historical monument representing shivaji maharaj's grandfather ignored by government