
बेलकुंड (जि.लातूर ): औसा येथे लिंबू विक्री करण्यासाठी निघालेल्या दुचाकीस्वाराला अज्ञात वाहनाने धडक दिली. आणि त्यात तो जागेवरच मृत्युमुखी पडला. ही हृदयद्रावक घटना औसा तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील मनोहर तांडा येथे घडली.
औसा-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील मनोहर तांडा (ता.औसा) येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकी चालकाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (ता. १३) सकाळी घडली. चंद्रकांत विठ्ठल हुलगुंडे (वय ५५) (रा. करजखेडा ता. जि. उस्मानाबाद) असे मृत दुचाकी चालकाचे नाव आहे. या प्रकरणी कैलास हुलगुंडे यांच्या फिर्यादीवरून भादा येथील पोलिस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रकांत हुलगुंडे हे (एमएच २५ एपी ८८९८) या दुचाकीवरून औसा येथे लिंबू विक्री करण्यासाठी पहाटेच्या सुमारास निघाले असता त्यांच्या दुचाकीला महामार्गावरील मनोहर तांडा येथे अज्ञात वाहनाने मागून जोरात धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. बेलकुंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. या प्रकरणी पुढील तपास बीट अंमलदार कमाल शेख हे करित आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.