नांदेड - वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण 

प्रल्हाद कांबळे
मंगळवार, 31 जुलै 2018

नांदेड : जंगलातील बेवारस सागी लाकडाचा पंचनामा करणाऱ्या दोन वनविभागाच्या कर्चाऱ्यांना बेदम मारहाण करून शासकिय कामात अडथळा निर्माण केला. या प्रकरणी किनवट ठाण्यात सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

नांदेड : जंगलातील बेवारस सागी लाकडाचा पंचनामा करणाऱ्या दोन वनविभागाच्या कर्चाऱ्यांना बेदम मारहाण करून शासकिय कामात अडथळा निर्माण केला. या प्रकरणी किनवट ठाण्यात सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

किनवट तालुक्यातील गोकूंदा जंगलात बेवारस पडलेली सागी लाकडांचा पंचनामा करण्यासाठी सोमवारी (ता. 30) किनवट विभागातील वनपाल बालाजी संतपाल आणि वनरक्षक नुरोद्दीन काझी हे दोघे गेले होते. परंतु गोकुंदा भागातील राहणारे शेख कुदरत शेख गनी, शेख वसीम शेख गनी, शेख महमद सरदार, शेक सरदार शेख कासीम, शेख उस्मान आणि शेख मोहमद शेख उस्मान हे तिथे पोहचले. वनविभागाचे कर्मचारी यांना वाद घातला. तुम्ही येथे येऊन पंचनामा का करता असे म्हणून शिविगाळ करत दोघांनाही मारहाण केली. एवढेच नाही तर चक्क ठार मारण्याची धमकी दिली. तसेच शासकिय कामात अडथळा निर्माण केला. वननिरीक्षक राहूल शेळके यांनी या दोघांना रुग्णालयात पाठवून स्वत: किनवट ठाण्यात जाऊन तक्रार दिली. यावरून पोलिसांनी वरील सर्व आरोपींविरूद्ध शासकिय कामात अडथळा व मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक कपील आगलावे हे करीत आहे.
 

Web Title: hitting forest department employee at nand