आशा सेविकांचे धरणे आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 एप्रिल 2017

बीड - महिलांची प्रसूती शासकीय आरोग्य संस्थेत झाल्यास आशा स्वयंसेविकांना देण्यात येणारे ६०० रुपये मानधन वाढवून ते प्रतिप्रसूती १ हजार रुपये इतके देण्यात यावे यासह इतर विविध मागण्यांसाठी आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक महिलांनी बुधवारी (ता. १९) बीड पंचायत समिती कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. 

महिलांची प्रसूती शासकीय आरोग्य संस्थेत झाल्यास आशा स्वयंसेविकांना देण्यात येणारे ६०० रुपये मानधन वाढवून ते प्रतिप्रसूती १ हजार रुपये इतके देण्यात यावे, आशा स्वयंसेविकांना ५१ प्रकारची कामे करावी लागत असल्याने त्यांना कामावर आधारित मोबदला देण्याऐवजी सध्या देण्यात येणाऱ्या मोबदल्यात तीनपट वाढ करण्यात यावी, आशा स्वयंसेविकांना संपर्क साधण्यासाठी १२०० रुपये तर गटप्रवर्तकांना २४०० रुपये मोबाईल भत्ता देण्यात यावा, एएनएम व जीएनएम यांच्या रिक्त पदावर ५० टक्के आशा व गटप्रवर्तकांना पदोन्नती देण्यात यावी, गटप्रवर्तकांना स्मार्ट डायरी देण्याचे शासनाने मान्य केले असून ती तत्काळ देण्यात यावी, शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे आशा वर्कर व गटप्रवर्तकांना टी.ए. व डी.ए. देण्यात यावा, त्यांच्या गणवेश भत्त्यात वाढ करण्यात यावी, त्यांना जनश्री विमा योजना व राजीव गांधी आरोग्यदायी विमा योजना लागू करावी यासह इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य आशा स्वयंसेविका व समन्वयक महासंघाच्या वतीने बुधवारी बीड पंचायत समिती कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन आंधळे, राज्य संघटक दत्ता देशमुख, प्रदेश कार्याध्यक्ष कमल बांगर, प्रदेशाध्यक्ष भगवान देशमुख यांच्यासह आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

Web Title: hold protest in beed