ॲडव्हान्स द्या, राहायला या!

Flat-Home
Flat-Home

औरंगाबाद - कोणतीही विचारपूस, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करताच घरमालक घरे, खोल्या, फ्लॅट भाड्याने देत आहेत. भाड्याचे नियमित पैसे मिळतील का एवढाच अंदाज ते घेतात. शिवाय ओळखीने किंवा ब्रोकरच्या तडजोडीने घरे भाड्याने दिली जातात. काही अपवाद वगळले तर, सर्रास हे प्रकार घडत आहेत. मात्र, भाडेकरूंची पूर्ण माहिती नसल्याने त्यांनी केलेल्या चुकीच्या वर्तनामुळे अनेकदा घरमालकांना कायद्याच्या कचाट्यात सापडावे लागते.

शहरातून दहशतवादविरोधी पथक व सीबीआयने केलेल्या कारवाईत दोन भाडेकरूंना अटक केली. त्यामुळे त्या घरमालकांना पोलिस, तपास यंत्रणा व लोकांच्या प्रश्‍नांच्या भडिमाराला सामोरे जावे लागले. ही घटना ताजी असतानाही त्यातून घरमालकांनी कोणताही धडा घेतलेला नाही. घरभाडे आणि ॲडव्हान्ससाठी घाई करून किरायाने किंवा कॉट बेसिसवर खोल्या देताना कोणतीही खातरजमा केली जात नसल्याचे ‘सकाळ’च्या पाहणीत समोर आले आहे.

घरमालकांनी सजगता दाखविणे अत्यंत गरजेचे आहे. भाडेकरूंच्या माहितीचा फॉर्म पोलिस ठाण्यात उपलब्ध आहे. भाडेकरूंकडून आधार कार्ड किंवा मतदान ओळखपत्राची झेरॉक्‍स, दोन फोटो घेऊन पोलिस ठाण्यात त्यांच्याविषयी माहिती द्यावी. ही प्रक्रिया करणे घरमालकावर कायदेशीरदृष्ट्या बंधनकारक आहे.
- नागनाथ कोडे, सहायक पोलिस आयुक्त, गुन्हे शाखा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com