एसटी बसच्या अधिकाऱ्याचा ‘ असा ’ ही प्रामाणिकपणा

BUS OFFICER
BUS OFFICER

नांदेड : समाजात आजही प्रामाणिकपणा जिवंत असल्याचा उत्तम नमुना अर्धापूर (जिल्हा नांदेड) येथील बसस्थानकावर पहावयास मिळाला. बसस्थानकावरील वाहतुक नियंत्रक बालाजी शिंदे यांनी प्रामाणिकतेतून दाखवून दिला आहे. एका प्रवाशाचा बसस्थानकावर विसरलेला साठ हजार रुपये किंमतीचा लॅपटॉप त्यांनी सुरक्षित ठेवून त्या प्रवाशाशी संपर्क साधून तो परत केला आहे.  

आजच्या बदलत्या समाज व्यवस्थेत माणसं एकमेकांपासून खूप दुरावत चालली आहे. पैशासाठी अनेक माणसं वाटेल ते करतात. अगदी नाते- गोते ही तोडण्यासाठी ते मागे पुढे पहात नाहीत. पैशासाठी आपण प्रामाणिकपणा विसरून गेलोय. परंतु अर्धापूर बसस्थानक येथील वाहतूक नियंत्रक बालाजी शिंदे यांनी प्रवाशाचा हरवलेला ६० हजार रुपये किंमतीचा लॅपटॉप सुरक्षित सांभाळून त्या प्रवाशाला बोलावून परत केला आहे. यामुळे पैशाच्या पाठीमागे लागून प्रामाणिकपणा हरवलेल्या समाजात आजही इमानदार व्यक्तींनी प्रामाणिकपणा जिवंत ठेवला आहे. 

बालाजी शिंदेंचा असाही प्रामाणीकपणा...
  
नांदेड - उमरखेड प्रवास करताना एका प्रवाशाचा लॅपटॉप राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये विसरून राहिला होता. अर्धापूर येथील बसस्थानकाचे वाहतुक नियंत्रक बालाजी शिंदे यांनी ६० हजार रूपये किंमतीच्या लॅपटॉप असलेल्या बॅग मधील कागदपत्रे बघितली व लॅपटॉप हरवलेल्या व्यक्तीशी संपर्क केला असता तो लॅपटॉप उमरखेड येथील निलेश शहाणे यांचा असल्याचे स्पष्ट झाले. त्यावरून बालाजी शिंदे यांनी तो लॅपटॉप निलेश शहाणे यांना सुपुर्त केला. 

समाजात अनेक व्यक्ती पैशाने श्रीमंत असतात पण मनाची श्रीमंती असणारी माणसं खूप कमी प्रमाणात असतात. विश्वाची निर्मिती करताना परमेश्वराने अशीही काही देवदुत पृथ्वीतलावर पाठवले आहेत. याची प्रचिती बालाजी शिंदे यांच्या प्रामाणिकतेतून आली. त्यामुळे बालाजी शिंदे हे मनाने खुप श्रीमंत असल्याच्या भावना सुज्ञ नागरिकांकडून ऐकायला येत आहेत. तसेच त्यांच्या या प्रामाणिकपणाची संपुर्ण परिसरातुन प्रशंसा होत आहे. धावपळीच्या दुनियेत कोणी कोणाला विचारायला तयार नाही. 

माणुसकीचा झरा अजूनही वाहतोय..

हरवलेला लॅपटॉप व महत्वाची कागदत्रे परत मिळतील अशी अपेक्षा मला नव्हती. पण वाहतूक नियंत्रक बालाजी शिंदे यांचा मला दोन दिवसानंतर फोन आला. आपले लॅपटॉप व महत्वाची कागदपत्रे माझ्याकडे सुरक्षित आहेत. ती अर्धापूर येथे बसस्तानकावर येऊन घेऊन जावी. हे ऐकून मला खूप आनंद झाला आणि मला लॅपटॉप परत मिळाला. या घटनेनंतर मला आजही समाजात प्रामाणिक व्यक्ती आहेत याची खात्री पटली.- निलेश शहाणे, प्रवासी, उमरखेड (जिल्हा यवतमाळ).  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com