सचखंडच्या यात्री निवास कर्मचाऱ्यांत ‘कोरोना’ची धास्ती

प्रल्हाद कांबळे
Saturday, 7 March 2020

जगभरात फैलावत असलेल्या 'कोरोना व्हायरसने' दहशत निर्माण केली आहे. या भयंकर व जिवघेण्या व्हायरसची नांदेड जिल्ह्यातही प्रचंड दहशत असून या जिवघेण्या 'कोरोना व्हायरस' पासून स्वतः चा बचाव करण्याच्या उद्देशाने सचखंड गुरुद्वारा बोर्डच्या यात्री निवासस्थानांतील कर्मचाऱ्यांनी उपाययोजना करण्यास सुरुवात केली. 

नांदेड : येथील शिख धर्मियांचे पवित्रस्थान तख्त सचखंड श्री हुजूर साहीब गुरुद्वारा येथे होळी सनाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या 'हल्ला बोल' या धार्मिक कार्यक्रमासाठी प्रतिवर्षी देश- विदेशातून हजारोंच्या संख्येने यात्रेकरु येत असतात. प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी सोमवारी (ता. नऊ) मार्च रोजी होळी व १० मार्च रोजी धुळीवंदन असल्यामुळे या दोन्ही दिवसी तख्त सचखंड गुरुद्वारा येथे विविध धार्मिक कार्यक्रमांसह 'हल्ला बोल' हा पारंपारिक धार्मिक उत्सव साजरा केला जातो. 

नांदेड शहर हे शिखांची दक्षिण काशी म्हणून जगभरात ओळखल्या जाते. या ठिकाणी शिख धर्माचे दहावे व शेवटचे श्री. गुरु गोविंदसिंग यांची समाधीस्थळ आहे. आपल्या शेवटच्या देहधारी गुरूचे दर्शन घेण्यासाठी लाखों भाविक दरवर्षी येत असतात. काही रेल्वे, विमान तर काही आपल्या वाहनाद्वारे देशाच्या विविध भागातून येत असतात. त्यांना या ठिकाणी कुठलाच त्रास होणार नाही याची काळजी नेहमीच सचखंड गुरूद्वारा बोर्ड घेत असते. 

हेही वाचा‘निर्भया वॉक’मध्ये सहभागी व्हा- एसपी विजयकुमार मगर

'कोरोना व्हायरसची' दहशत 

देश- विदेशातून येणारे यात्रेकरु सचखंड गुरुद्वारा बोर्डाच्या यात्री निवासस्थानांमध्ये निवासस्थानांमध्ये राहतात. सध्या चीन येथून संपूर्ण जगभरात फैलावत असलेल्या 'कोरोना व्हायरसने' दहशत निर्माण केली आहे. या भयंकर व जिवघेण्या व्हायरसची नांदेड जिल्ह्यातही प्रचंड दहशत असून या जिवघेण्या 'कोरोना व्हायरस' पासून स्वतः चा बचाव करण्याच्या उद्देशाने सचखंड गुरुद्वारा बोर्डच्या यात्री निवासस्थानांतील कर्मचाऱ्यांनी उपाययोजना करण्यास सुरुवात केली. 

गुरूद्वारा बोर्डाकडून खबरदारी म्हणून कर्मचाऱ्यांना मास्क

कर्मचाऱ्यांनी तोंडावर मास्क लावण्यास सुरुवात केली आहे. होळी व इतर महत्वाच्या सनानिमित्त नांदेडच्या सचखंडचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक दाखल होत असतात. त्यांच्या सेवेत कुठलीच कसर राहणार नाही याची काळजी घेत येथील सर्वच विभागाचे कर्मचारी सतर्क राहतात. कर्मचाऱ्यांच्या आरोग्याच्या सुरक्षा व्यवस्थेसाठी गुरुद्वारा बोर्ड प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांना मास्क देण्यात आले आहेत. हल्लाबोलसाठी देश विदेशातून येणाऱ्या भाविकांच्या संपर्कात राहणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सतर्कता म्हणून मास्क वापरणे सुरू केले असल्याचे गुरूद्वारा बोर्डाचे सरदार ठाणसिंग बुंगई यांनी सांगितले. 

येथे क्लिक करा - Video And Photos : विद्यार्थ्यांनी सुरु केले अन्नछत्र, कोणासाठी? ते वाचाच

दशमेश हॉस्पीटलकडून मास्कचे वितरण

सचखंड गुरूद्वाराला येणाऱ्या भाविकांच्या संपर्कात राहणाऱ्या सर्वच कर्मचाऱ्यांना दशमेश हॉस्पीटलकडून मास्क देण्यात आले आहे. कोरोना व्हायरसची काळजी घेणे आवश्‍यक असल्याने सचखंड गुरूद्वारा बोर्डाने हे पाऊल उचलले आहे. श्री. गुरू गोविंदसिंग एनआरआय निवास, पंजाब भवन, सचखंड यात्री परिसर आणि श्री. रामदासजी सराय येथील कर्मचारी मास्क लावून सेवा करत आहेत. तसेच दसमेश हॉस्पीटलचे एक वैद्यकीय पथक कार्यरत ठेवण्यात आले आहे. डॉ. परमवीरसिंह हे आपल्या पथकासह सज्ज आहेत. अशी माहिती गुरूद्वारा बोर्डाचे अधिक्षक गुरूविंदरसिंग वाधवा यांनी दिली आहे.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Horror of 'Corona' among Sachkhand passenger employees nanded news