

kalamb sub district hospital patient death relatives allege medical negligence
esakal
कळंब : येथील उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी निष्काळजीपणा केल्याने आमच्या माणसाचा मृत्यू झाला,' असा आरोप करत रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णालयात गोंधळ घातल्याची घटना बुधवार (ता.29) पहाटेच्या सुमारास घडली. दरम्यान या गोंधळात रुग्णालयातील साहित्याची तोडफोड झाल्याची माहिती समोर येत आहे. मृत्यूदेह ताब्यात घेणार नसल्याचाही पवित्रा रुग्णाच्या नातेवाईकांनी घेतला होता. पोलीस व रुग्णालय प्रशासनाने तडजोडीची भूमिका घेतल्याने हे प्रकरण आपापसात मिटल्याचे समजते.