"ब्लॅक टू व्हाईट' कसे? गुजरातचे सर्च इंजिन धावले पुढे! 

शेखलाल शेख - सकाळ वृत्तसेवा 
सोमवार, 28 नोव्हेंबर 2016

औरंगाबाद - जुन्या हजार, पाचशे रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याच्या निर्णयानंतर काळा पैसा पांढरा कसा करावा यासाठी अनेक जण शक्कल लढवत आहेत. काही जणांनी मित्रमंडळी, नातेवाईक, ओळखीच्या लोकांच्या खात्यात रक्कम टाकण्याचा खटाटोप केला. मात्र याहीपुढे जाऊन अनेकांनी "गुगल' सर्च इंजिनचा सहारा घेत काळा पैसा पांढरा कसा करता येईल यासाठी सर्चवर सर्च केले आहेत. मागील 20 ते 27 नोव्हेंबर या सात दिवसांचा विचार केला तर गुगलवर "हाऊ टू कर्न्व्हट ब्लॅक मनी इनटू व्हाईट' नावाने (ओळीने) गुजरात राज्यात देशात सर्वाधिक सर्च झाले आहे! यामध्ये महाराष्ट्र दहाव्या क्रमांकावर आहे.

औरंगाबाद - जुन्या हजार, पाचशे रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याच्या निर्णयानंतर काळा पैसा पांढरा कसा करावा यासाठी अनेक जण शक्कल लढवत आहेत. काही जणांनी मित्रमंडळी, नातेवाईक, ओळखीच्या लोकांच्या खात्यात रक्कम टाकण्याचा खटाटोप केला. मात्र याहीपुढे जाऊन अनेकांनी "गुगल' सर्च इंजिनचा सहारा घेत काळा पैसा पांढरा कसा करता येईल यासाठी सर्चवर सर्च केले आहेत. मागील 20 ते 27 नोव्हेंबर या सात दिवसांचा विचार केला तर गुगलवर "हाऊ टू कर्न्व्हट ब्लॅक मनी इनटू व्हाईट' नावाने (ओळीने) गुजरात राज्यात देशात सर्वाधिक सर्च झाले आहे! यामध्ये महाराष्ट्र दहाव्या क्रमांकावर आहे. राज्यात नागपूर यामध्ये आघाडीवर असून दुसऱ्या क्रमांकावर पिंपरी-चिंचवड, तिसऱ्या क्रमांकावर मुंबई, तर चौथ्या क्रमांकावर पुणे शहराचा क्रमांक आहे. 

गुजरातमध्ये सर्चवर सर्च 
देशात सध्या अनेक जण गुगलवर सर्च करून काळा पैसा कसा पांढरा करावा यासाठी माहिती मिळविली जात आहे. गुगलवरील तज्ज्ञांच्या टिप्स, विविध फंडे याची माहिती मिळविली जात आहे. 20 नोव्हेंबरपासूनचा विचार केला तर "हाऊ टू कर्न्व्हट ब्लॅक मनी इनटू व्हाईट' सर्च करण्यात गुजरात (शंभर टक्के) देशात आघाडीवर, त्याखालोखाल छत्तीसगड 68 टक्के, उत्तराखंड 67, गोवा 65, हरयाणा 55, पंजाब 51, हिमाचल प्रदेश 47, नवी दिल्ली 47, झारखंड 44 तर यामध्ये महाराष्ट्र दहाव्या क्रमांकावर असून महाराष्ट्रात हे प्रमाण 43 टक्के आहे. 

गुगल "टॉपिक'मध्ये "हवाला' नंबर एकवर 
जुन्या, हजार पाचशे रुपयांच्या नोटा बंद झाल्यापासून हवालावरसुद्धा मोठे संकट आले आहे. हवालातून कोट्यवधींची उलाढाल करणारे सध्या चलन तुटवड्यामुळे बेजार झालेले आहेत. 20 नोव्हेंबरपासून गुगल सर्चमध्ये हवाला "टॉपिक' नंबर एक ट्रेंडमध्ये आहे. मोठ्या प्रमाणात सर्च झाल्याने ते 20 नोव्हेंबरपासून आठवड्यात क्रमांक एकवर आहे. मागील सात दिवसांचा 20 नोव्हेंबरपासूनचा विचार केला तर टॉपिकमध्ये करन्सी, ब्लॅक कलर, पेमेंट या टॉपिकचा क्रमांक लागतो. 

सर्चमध्ये नागपूर पुढे 
महाराष्ट्रात 20 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर या सात दिवसांचा विचार केला तर देशात महाराष्ट्र दहाव्या क्रमांकावर आहे. यामध्ये आता महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा विचार केला तर "हाऊ टू कर्न्व्हट ब्लॅक मनी इनटू व्हाईट' या विषयावर सर्चमध्ये नागपूरचा क्रमांक एक आहे. येथे शंभर टक्के सर्च आहे, तर दुसऱ्या क्रमांकावर पिंपरी-चिंचवडचा क्रमांक लागतो. येथे 51, मुंबई (48) तिसऱ्या क्रमांकावर, तर पुणे (31) चौथ्या क्रमांकावर आहे. 

अबब....! सर्चमध्ये 450 टक्‍क्‍यांची वाढ 
देशभरातील मागील सात दिवसांचा गुगल सर्च ट्रेंडचा विचार केला तर "हाऊ टू कन्व्हर्ट' या शब्दाच्या सर्चमध्ये 450 टक्के वाढ झालेली आहे. तर "कन्व्हर्ट ब्लॅक मनी इनटू व्हाईट इंडिया' यामध्ये 170 टक्के वाढ आहे. "व्हाय टू कन्व्हर्ट ब्लॅक मनी इनटू व्हाईट' यामध्ये 130 टक्के तर "कर्न्व्हशन ऑफ ब्लॅक मनी इनटू व्हाईट' यामध्ये 110 टक्के वाढ आहे. 

"ब्लॅक मनी' शब्दात पूर्वेकडील राज्ये आघाडीवर 
देशात पूर्वेकडील राज्यांत टॅक्‍समध्ये विशेष सूट आहे. त्यामुळे ब्लॅक मनी पांढरा करण्यासाठी काही जण कायद्याचा आधार घेऊन पूर्वेकडील राज्यात काळा पैसा घेऊन जाण्याच्या घटना घडल्या होत्या. यामध्ये "ब्लॅक मनी' नावाने सर्च करण्यात मागील सात दिवसांचा विचार केला तर मेघालय देशात आघाडीवर आहे. त्याखालोखाल नागालॅंड, मणिपूर, गोवा, अंदमान निकोबार बेट, सिक्कीम, त्रिपुरा, दादरा नगर हवेली, पुद्दुचेरी, मिझोरम या दहा राज्ये, केंद्रशासित प्रदेशांचा समावेश आहे. 

राज्यात करन्सी टॉपिकमध्ये 450 टक्के वाढ 
महाराष्ट्रात सर्चिंग टॉपिकचा विचार केला तर करन्सी टॉपिकमध्ये 20 ते 27 नोव्हेंबरदरम्यान सात दिवसांत 450 टक्के वाढ झाल्याचे दिसते. पेमेंट टॉपिकमध्ये 350 टक्के, ब्लॅक कलरमध्ये 170 टक्के, तर टॅक्‍स टॉपिकमध्ये 70 टक्के वाढ गुगलवर दिसते. 

Web Title: How Black to White money