बारावीची पुस्तके आता पीडीएफ स्वरूपात 

सुहास सदाव्रते 
Wednesday, 8 April 2020

देशभरात सध्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. अशातच बारावीच्या विद्यार्थ्यांना स्वयंअध्ययन करता यावे, यासाठी बालभारती व राज्य मंडळाने ऑनलाईन पाठयपुस्तके उपलब्ध करून दिली आहे, हे विशेष. 

जालना -  देशभरात सध्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. अशातच बारावीच्या विद्यार्थ्यांना स्वयंअध्ययन करता यावे, यासाठी बालभारती व राज्य मंडळाने ऑनलाईन पाठयपुस्तके उपलब्ध करून दिली आहे, हे विशेष. 

कोरोना व्हायरस घटनेच्या पार्श्वभूमीवर पंधरा दिवसापासून संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. सध्या परिस्थिती संवेदनशील असल्याने संचारबंदी कधी निघेल हे सांगता येईल अशी परिस्थिती नाही. साधारणपणे या महिन्यापासून बारावीच्या अभ्यासक्रमाला महाविद्यालयातून सुरवात केली जाते. कारण अभ्यासक्रम पूर्ण होण्यासाठी कालावधी कमी पडतो.परंतु कोरोना विषाणू ची लागण मोठ्या प्रमाणात होत असल्याने संचारबंदी उठविण्यासाठी परिस्थिती नाही. यामुळे शाळा महाविद्यालयाचे शैक्षणिक वेळापत्रक मात्र बिघडले आहे.

हेही वाचा : जालन्याच्या इतिहासात प्रथमच स्टील उद्योग बंद

राज्यातील बारावी वर्गाचा अभ्यासक्रम यंदा बदलला आहे. नवीन अभ्यासक्रमाची विविध भाषा विषय व इतर विषयाची पुस्तकांची छपाईचे काम पूर्ण झाले असल्याची विश्वसनीय माहिती आहे. राज्यात सगळीकडे बंद असल्याने वाहतूक बंद आहे,यामुळे कदाचित पुस्तकाचे वितरण होवू शकत नाही.

हेही वाचा : जालना जिल्ह्यात ३२ चेकपोस्ट

बारावीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पुस्तके ऑनलाइन उपलब्ध करण्याबाबत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी बालभारती अधिकारी यांना विशेष सूचना दिलेल्या आहेत. पुणे येथील बालभारती ने बारावीची पुस्तके आता ऑनलाइन उपलब्ध करून दिली आहेत, हे विशेष. बालभारती च्या एका संकेतस्थळावर सदर पुस्तके उपलब्ध करून दिली आहेत. 

सध्या सुट्या असल्याने विद्यार्थ्यांना घरीच अभ्यास करण्यासाठी या ऑनलाइन पुस्तकाचा मोठा उपयोग होणार आहे. स्वयं अध्ययनाकडे विद्यार्थीचा अधिक कल दिसून येत आहे. 
- प्रा.अरुण कुलकर्णी ,अंकुशनगर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: HscHsc book in pdf format