पावसात विरघळली माणुसकी! 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 जून 2018

औरंगाबाद - तब्बल 48 तासांपासून तो मकाई गेटलगत निपचित पडलेला आहे. सोसाट्याचा गार वारा, पावसाचे फटकारे बसल्यानंतर अंगात त्राण उरला नाही, मरणासन्न अवस्था झाल्यानंतर हालचालही थंडावली. कुणी म्हणाले, अरे... तो गेला...! पण श्‍वास सुरू असल्याचे लक्षात आले. एकाने पोलिस, आपत्कालीन व्यवस्थेला कळविले; पण रात्रीपर्यंत कोणतीही मदत मिळाली नाही... एकप्रकारे माणुसकीच पावसात विरघळली. 

घाटी रुग्णालयाच्या हाकेच्या अंतरावरील मकाई गेटजवळ पंचावन्नवर्षीय व्यक्ती गत दोन दिवसांपासून पडून आहे. मळके कपडे, अंगावर चादर, दाढी वाढलेली अशी त्याची अवस्था; परंतु त्याच्याकडे दोन दिवस झाले तरीही कुणाचेच लक्ष गेले नसावे! ऐतिहासिक मेहमूद प्रवेशद्वाराचे कवाड पडले तेव्हा साऱ्यांचे लक्ष त्याकडे वेधले गेले. यावर सोशल मीडियातून प्रतिक्रियाही उमटल्या; पण 48 तासांपासून अशाच ऐतिहासिक मकाई गेटजवळ एक 55 वर्षीय व्यक्ती निपचित मरणासन्न अवस्थेत पडली, तरीही त्याकडे कुणीही पाहत नाही, अशी अवस्था आहे. 

जिंदगी अभी बाकी है... 
तो निपचित पडून होता. त्यामुळे तो मृत झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला; पण प्रत्यक्षदर्शींचे ज्यावेळी या व्यक्तीकडे लक्ष गेले तेव्हा त्याचा श्‍वास सुरू असल्याचे लक्षात आले. त्यानंतर प्रत्यक्षदर्शीने पोलिस व आपत्कालीन रुग्णवाहिकेला संपर्क केला; परंतु त्यांच्याकडून रात्रीपर्यंत प्रतिसाद मिळाला नव्हता. 

Web Title: Humanity dissolve in the rain